अर्थसंकल्पाचा कृती अहवाल सादर करा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 18 जानेवारी 2020

पणजी:अर्थसंकल्पातील आश्‍वासनांचा कृती अहवाल द्या.सरकारने मागील अर्थसंकल्पात नमूद केलेल्या विविध विकासकामांबाबत दिलेल्या आश्‍वासनांचा कृती अहवाल येत्या फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सादर करावा.भाजप सरकार अपयशी ठरले आहे व लोकांना आश्‍वासने देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी महसूलमंत्री व पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला.

पणजी:अर्थसंकल्पातील आश्‍वासनांचा कृती अहवाल द्या.सरकारने मागील अर्थसंकल्पात नमूद केलेल्या विविध विकासकामांबाबत दिलेल्या आश्‍वासनांचा कृती अहवाल येत्या फेब्रुवारीच्या विधानसभा अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी सादर करावा.भाजप सरकार अपयशी ठरले आहे व लोकांना आश्‍वासने देऊन दिशाभूल करत असल्याचा आरोप माजी महसूलमंत्री व पर्वरीचे अपक्ष आमदार रोहन खंवटे यांनी केला.
पुढील महिन्यातील विधानसभा अधिवेशन पाच दिवसांचे आहे. या अधिवेशनासाठी अनेक प्रश्‍न पाठवले आहेत. मात्र, अधिवेशनाच्या पहिल्या चार दिवसांत प्रश्‍नोत्तराच्या तासावेळी माझा एकही प्रश्‍न नाही व पाचव्या दिवशी एक प्रश्‍न आहे तो सातव्या क्रमांकावर आहे.त्यामुळे तोसुद्धा चर्चेला येण्याची शक्यता नाही. सरकार विरोधकांनी मांडलेले प्रश्‍न चर्चेसाठी घेण्यासच इच्छुक नाही असेच दिसून येत आहे.मागील अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी मुख्यमंत्र्यांनी पावसाळी अधिवेशनात बेकायदा बांधकामे तसेच विकासासंदर्भात अनेक आश्‍वासने दिली होती ती पूर्ण झाली व त्यांनी सादर केलेला अर्थसंकल्प कितपत खरा ठरला याची माहिती जनतेलाही उपलब्ध करावी. माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आश्‍वसनांचा आढावा देण्याची प्रथा सुरू केली होती ती विद्यमान मुख्यमंत्र्यांनीही सुरू ठेवावी. पाच दिवसांचे अधिवेशन ठेवून विरोधकांना अधिकाधिक संधी न देण्याचा हा प्रकार आहे, असा आरोप खंवटे यांनी केला.
सरकारमध्ये मी महसूलमंत्री असताना गोव्यातील जमिनींच्या सुरक्षिततेसंदर्भात दोन विधेयके विधानसभेत मांडली होती व मान्यतेसाठी ती कायदा खात्याकडे पाठवण्यात आली होती.शेतजमिनी शेतकऱ्यालाच विकण्याची तसेच पडिक जमिनीवर मालकाचा हक्क कायम ठेवून त्या शेतीसाठी कंत्राट पद्धतीवर देणे अशी दोन विधेयके होती. ही दोन्ही विधयके सरकारने मंजूर करून घेतल्यास राज्यातील शेतजमिनी सुरक्षित राहू शकतात, असे खंटले म्हणाले. राज्यातील आर्थिक स्थिती खालावली आहे.आतापर्यंत सरकारने सुमारे २००० कोटीपेक्षा अधिक रक्कम कर्ज घेतली आहे व आणखी सुमारे ५६० कोटी कर्ज घेण्याच्या प्रयत्नात आहे.

हे वाचा:म्हापसा अर्बन बँकेच्या संचालकाविरुद्ध आर्थिक गुन्हे शाखेत तक्रार

कर्ज घेतलेली रक्कम ही सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतनावरच खर्च होत आहे.राज्यातील अनेक कामे निधाअभावी प्रलंबित आहेत.कंत्राटदारांना कामाची बिले मिळत नसल्याने नवीन कामे घेण्यास पुढे कोणी येत नाही.पुढील तीन महिन्यात सरकारची आर्थिक स्थिती कमकुवत होण्याची शक्यता आहे.अर्थव्यवस्था व पर्यटन क्षेत्रात घसरण होत आहे. गोमंतकियांना आश्‍वासने देऊन खेळवण्याची प्रथा सरकारने बंद व्हायला हवी. विधानसभेचा वापर हा गोमंतकियांच्या हितासाठी केला जात नाही, अशी टीका खंवटे यांनी केली.
राज्यात विज्ञान व सामुदायिक पार्क सुरू करण्याचा इच्छा मुख्यमंत्री व मंत्री मायकल लोबो यांनी विज्ञान चित्रपट महोत्सव कार्यक्रमात व्यक्त केली मात्र पर्वरी येथे अशा प्रकारच्या पार्कचे बांधकाम पूर्ण झाले आहे. मात्र उपकरणांसाठी ते उपेक्षित आहे.सुमारे ६० लाखांची उपकरणे या पार्कमध्ये उपलब्ध करणे आवश्‍यक आहे.त्यामुळे मुख्यमंत्री व आयटी मंत्र्यांनी लक्ष घालून या पार्कमध्ये विद्यार्थ्यांसाठी आनंद घेण्याबरोबरच शिक्षणाची सोय उपलब्ध करण्याची मागणी त्यांनी केली.

संबंधित बातम्या