असुरक्षित महिलांसाठी ‘रोस्‍तो राईड’

प्राची नाईक
मंगळवार, 10 मार्च 2020

पणजी : गोव्यात रात्री अपरात्री बस, मोटारसायल, रिक्षा किंवा टॅक्सी मिळणे कठीणच आणि जर मिळालीच, तरी प्रवासखर्च महागतो. तसेच सुरक्षितेबाबत शंका. त्यामुळे भीतीपोटीच महिला आणि वयस्कर मंडळी रात्री - अपरात्री प्रवास करणे टाळतात. रात्रपाळी करणाऱ्या नोकरदार महिलांनादेखील याचा त्रास होतो. हे सगळे लक्षात घेऊन ‘रोस्तो अभियानां'तर्गत ‘रोस्तो राईड शेअर’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

पणजी : गोव्यात रात्री अपरात्री बस, मोटारसायल, रिक्षा किंवा टॅक्सी मिळणे कठीणच आणि जर मिळालीच, तरी प्रवासखर्च महागतो. तसेच सुरक्षितेबाबत शंका. त्यामुळे भीतीपोटीच महिला आणि वयस्कर मंडळी रात्री - अपरात्री प्रवास करणे टाळतात. रात्रपाळी करणाऱ्या नोकरदार महिलांनादेखील याचा त्रास होतो. हे सगळे लक्षात घेऊन ‘रोस्तो अभियानां'तर्गत ‘रोस्तो राईड शेअर’ हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे.

गोमंतकीय महिलांसाठी, विशेषत: ज्या दररोज दूरचा प्रवास करतात आणि ज्यांना उशिरा प्रवास करावा लागतो, त्या आता इतर महिलांसोबत ‘रोस्तो राइड शेअर’द्वारे अगदी कमी विनामूल्य प्रवास करू शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून गोव्यातील महिला राज्यात इच्छितस्थळी जाण्यासाठी व्‍हॉट्‍सअॅपवर ९९२२४११२३९ या क्रमांकावर संदेश पाठवू शकतात.

या उपक्रमाची नुकतीच सुरवात असल्यामुळे इतर अॅपप्रमाणे अजून वाहन कुठे पोहोचले याचा मागोवा (ट्रॅक) घेता येत नसला, तरी या व्‍हॉट्‍सअप ग्रुपमध्ये कुणाला जोडण्यापूर्वी त्यांची ओळखपत्र आणि इतर माहिती घेतली जाते. ज्यामुळे सुरक्षितेची हमी मिळते. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी प्रत्येकाला एक ऑनलाईन फॉर्म भरून आपली माहिती द्यावी लागते. बाहेरच्या राज्यात कार पुलिंग सेवा, ओला उबर यासारख्या अॅपद्वारे सर्रास वापरल्या जात असल्या तरी गोव्यात ही संकल्पना अजून रुजू झालेली नाही.

या उपक्रमाचे उद्‍घाटन आंतरराष्ट्रीय महिला दिनी ‘सेन्सिबल अर्थ’ पर्वरी येथे पार पडला. ‘रोस्तो अभियाना’च्या सेसल रॉड्रिग्ज यांनी या उपक्रमाबद्दल सोशल मीडियाद्वारे लोकांना कल्पना दिली होती. त्यांना याबद्दल विचारल्यावर त्या म्हणाल्या, ‘या उपक्रमाद्वारे आम्ही ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी मदत करण्याचे प्रयत्न करीत आहोत.

आपणही सहभागी होऊ शकता...

गोव्यातील सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था अत्यंत बिकट स्थितीत आहे. म्हणूनच महिला चालक असल्यास त्या ‘ह्या’ वाटेने प्रवास करीत असून ‘माझ्या गाडीत एवढी आसने खाली आहेत’, असे ग्रुपवर टाकू शकते. त्यामुळे त्या वाटेवरून प्रवास करणाऱ्या महिलांना त्यांच्यासोबत जायला मदत होईल. हा प्रवास एकदम निःशुल्क असेल. सध्यातरी गोव्यातील मुख्य रहदारीच्या ठिकाणी जसे पणजी, मडगाव, म्हापसा अशा ठिकाणी ‘रोस्तो राइड शेअर’ व्यवस्था केलेली आहे. ती पुढे म्हणाली. प्रत्येक वाटेसाठी वेगळे व्‍हॉट्‍स ॲप ग्रुप केले गेले आहेत. आतापर्यंत २० पेक्षा अधिक महिलांना या ग्रुपमध्ये जोडण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

यांना ठरणार लाभदायक...

रस्त्यावर कमी रहदारी असणे फार महत्त्‍वाचे आहे. आपली जीवन गुणवत्ता सुधारण्यासाठी आपण कार पुलिंग किंवा बाईक पुलिंग यासारखे पर्याय स्वीकारायला पाहिजे. महिला या सेवेचा उपयोग केवळ कामावर जाण्यासाठीच करू शकत नाहीत, तर आवश्यकता असल्यास उशिरापर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमांमध्ये किंवा पार्टीतही जाण्यासाठी वापरू शकतात. ज्यांचे काम रात्री उशिरा समाप्त होते त्यांच्यासाठी ही सुविधा फायदेशीर आहे, असेही त्या म्हणाल्या.

गतिरोधकही रंगविले...

रोस्तो अभियान' हे सेसिल रॉड्रिग्स, सीमा चिमुलकर आणि प्रकाश मलानी यांनी सुरू केलेला आगळा वेगळा उपक्रम. 'रोस्तो राइड शेअर'ची कल्पना सेसल रॉड्रिग्ज यांना याच मोहिमेवेळी आली. या मोहिमेंतर्गत त्या आणि त्यांचा गट ठिकठिकाणी जावून रस्‍त्‍यावर असलेले खड्डे लोकांना दिसावे म्हणून त्यांच्या सभोवताली रंगवितात आणि त्यासोबत गतिरोधक वाहनचालकांना नीटपणे दिसावे म्हणून त्याच्यावर '#रोस्तो' लिहिले. आतापर्यंत या मोहिमेअंतर्गत '#रोस्तो' गटाने २०० हून अधिक गतिरोधक रंगविले आहेत. त्यांच्या कार्याला लोकांची प्रशंसा लाभत आहे. यासोबत रस्त्यावरील कचराही या गटाद्वारे उचलला जातो.
 

संबंधित बातम्या