म्हापश्यात ‘रोटरॅक्ट उद्योजक परिषद-२०२०

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

म्हापसा : रोटरॅक्ट क्लब, म्हापसा यांनी येत्या शनिवारी ८ व रविवारी ९ रोजी ‘रोटरॅक्ट उद्योजक परिषद-२०२०’ आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद ८ रोजी पेड्डे येथील बँडमिंटन इनडोअर स्टेडियममध्ये आणि ९ तारखेला पेड्डेतील टेबल टेनिस इनडोअर हॉलमध्ये होणार आहे.

श्रीधर काकुलो कॉमर्स व मॅनेजमेंट स्टडीज कॉलेजच्या सहकार्याने होणाऱ्या या परिषदेत स्टार्टअप्स व व्यवसाय विश्वा शी विद्यार्थ्यांना व नवउद्योजकांना ओळख करून दिली जाईल. या आगळ्या व नाविन्यपूर्ण परिषद उपक्रमाचा दै. ‘गोमन्तक’ माध्यम प्रायोजक आहे.

रोटरॅक्ट क्लब हा रोटरी इंटरनॅशनल क्लबचा संलग्न क्लब असून, १८ ते ३० वयोगटातील व्यक्ती, सदस्य यात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे या क्लबमध्ये युवा सदस्यांची संख्या ५०हून अधिक आहे व त्यांच्या नवकल्पनांना चांगला वाव मिळतो. महाविद्यालये आणि सरकारी यंत्रणांच्या सहकार्याने हा अशा प्रकारचा प्रथमच कार्यक्रम रोटरॅक्ट क्लब म्हापसा करीत आहे. युवावर्गात उदयोजकता प्रोत्साहन देण्यासाठी अनेक कंपन्या या उपक्रमात सहभागी होणार आहेत. नामवंत गोमंतकिय उद्योजकांची मार्गदर्शनपर व प्रेरणादायी व्याख्याने यावेळी होणार आहेत. शालेय स्तरापासूनच उद्योजकतेचे स्वप्न विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी शालेय तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची उपस्थिती यावेळी राहणार आहे. 

टोनी फर्नांडिस यांनी राजीनामा द्यावा

यावेळी या विद्यार्थ्यांना व्यवसायाचे ज्ञान, माहिती व अनुभव व प्रेरणा दिली जाईल. राज्यातील व शेजारच्या राज्यातील उद्योजक या परिषदेत सामील होणार असल्याने उपस्थितांना ईडीसी, कृषी आणि मत्स्योद्योग खात्यातील अधिकारी यावेळी त्यांच्या खातेनीहाय योजनांची माहिती देणार आहेत. युवा वर्गातील उद्योजकांसाठी याचा चांगला उपयोग होईल, अशी आशा यावेळी व्यक्त करण्यात आली आहे. गोवा

संबंधित बातम्या