कुडचडेत शाळकरी मुलांचा मृत्युमुळे हळहळ

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 10 मार्च 2020

कुडचडे: कुडचडे शहरातील दोन आणि सांगेतील एक मिळून एकाच दिवशी तीन शाळकरी मुलांचा वेर्णा येथील कार अपघातात झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृत्यूमुळे कुडचडे व सांगे शहरात एका बाजूने हळहळ तर दुसऱ्या बाजूने पालकांचे दुर्लक्ष आणि पोलिसांच्या निष्काळजीमुळे सोशल मिडियावरून टीकेची झोड उठविली जात असून या घटनेचा बोध घेऊन पोलिस यंत्रणा आता तरी कुडचडे भागात सक्रिय होणार काय ? असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे.

कुडचडे: कुडचडे शहरातील दोन आणि सांगेतील एक मिळून एकाच दिवशी तीन शाळकरी मुलांचा वेर्णा येथील कार अपघातात झालेल्या भीषण दुर्घटनेतील मृत्यूमुळे कुडचडे व सांगे शहरात एका बाजूने हळहळ तर दुसऱ्या बाजूने पालकांचे दुर्लक्ष आणि पोलिसांच्या निष्काळजीमुळे सोशल मिडियावरून टीकेची झोड उठविली जात असून या घटनेचा बोध घेऊन पोलिस यंत्रणा आता तरी कुडचडे भागात सक्रिय होणार काय ? असा प्रश्‍न नागरिकांतून विचारला जात आहे.

सिनेमा पाहण्यासाठी जातो असे सांगून घरातून बाहेर पडलेली शाळकरी मुले कार घेऊन स्टंटबाजी करण्यासाठी जातात काय, आणि ऐन तारुण्य कळण्या आधीच काळाच्या पडद्याआड जातात काय, हीच चर्चा दिवसभर नाक्‍या नाक्‍यावर केली जात आहे. यात पालकांबरोबर पोलिस यंत्रणेला अधिक दोष देण्यात येत आहे. दिवसभर 'तालांव' देणाऱ्या पोलिसांच्या नजरेतून मिसरूट न फुटलेली मुले आपले कार्य उरकण्यासाठी इतक्‍या लांब तरी कसे पोचतात.

शहराच्या आडोशाला काय चालते पोलिसांना ठाऊक असून सुद्धा त्यावर कारवाई केली जात नाही. त्यामुळेच असले प्रकार वाढीस लागले आहे. त्यातून हकनाक बळी जात आहे. शहरात अल्पवयीन मुले दुचाकी चालविताना ना पालकांना काही कळू देत नाहीत. ना पोलिसांना अल्पवयीन मुलांना रोखता येईना. त्यामुळे कुडचडे शहरात अल्पवयीन मुलांचे कारनामे वाढत चालले आहे. एक प्रकरण दाबल्यास इतरांना प्रोत्साहन मिळत जाते. पादचाऱ्यांना ठोकण्याचे प्रकार वाढले. पोलिस मात्र आपल्या आठ तासाची नोकरी करताना 'तालांव' आणि दुचाक्‍यांना टाळे ठोकण्यात दंग असतात. हे थोडे वेळ वगळून वाममार्गाला लागलेल्यांचे कंबरडे मोडण्यासाठी कृती का करीत नाही असे अनेक प्रश्‍न समाज माध्यमातून केले जात आहे.

वेर्णा येथे घडलेल्या दुर्घटनेत जोसुवा फर्नांडिस कुडचडे, रोहन सिक्वेरा -पांगळुणा सांगे व इथान फर्नांडिस कुडचडे या तिघा मित्रांचा बळी गेला. दोन्ही शहरात सन्नाटा पसरला आहे. घरातून जाताना भलतीच कारणे सांगितली. अन् जीव गमावून बसले याचा दोषारोप पालकांवर आला. पण नाक्‍यानाक्‍यावर असलेल्या पोलिस यंत्रणेने त्यांना वेळीच अल्पवयीन म्हणून रोखले असल्यास कदाचित दुर्घटना टळली असती.

'ड्रग्स' चा विळखा अधिक घट्ट होतोय.

कुडचडे परिसरात ड्रग्सचा व्यवहार सर्रासपणे चालत असल्याचे समाज माध्यमातून व सर्व सामान्य नागरिक बोलत आहे. पोलिस यंत्रणेला इतर सर्व गोष्टींचा सुगावा लागतो अन् अमलीपदार्थांसारख्या जीवघेण्या व्यवहाराचा अद्याप थांगपत्ता लागत नाही, की लावला जात नाही, असा प्रश्‍न निर्माण होत आहे. गुन्हेगारी मोडून शासकीय पुरस्कार मिळविणाऱ्या कुडचडे पोलिसांनी या व्यवहाराचा बिमोड केल्यास टीकेची झोड उडविणाऱ्या समाज माध्यमासहित सर्व सामान्य नागरिक नक्कीच पोलिस यंत्रणेला दुवा देतील.
 

संबंधित बातम्या