साकोर्डा पंचायत टँकरमुक्त करणार : मंत्री पाऊसकर  

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 31 जानेवारी 2020

मंत्री दीपक पाऊसकर; जलशुद्धीकरण प्रकल्पांच्या कामास प्रारंभ

तांबडीसुर्ला: साकोर्डा पंचायत क्षेत्रातील लोकांना शुध्दीकरण केलेल्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी उदळशे व मुरगे येथील ग्वालाशी विहिरीतील पाणी शुध्दीकरण करण्यासाठी दोन जलशुध्दीकरण प्रकल्पांना मान्यता मिळाली असून येत्या दोन महिन्यांत प्रकल्पांचे काम पूर्ण होणार आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत साकोर्डा परिसर टँकरमुक्त करणार असल्याची ग्वाही सावर्डेचे आमदार तथा सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पाऊसकर यांनी साकोर्डा येथे दिली.

जलशुध्दीकरण प्रकल्पांचे श्रीफळ वाढवून शुभारंभ केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी धारबांदोडा जिल्हा पंचायत सदस्य गोविंद गावकर, सरपंच जितेंद्र नाईक, उपसरपंच नेहा कालेकर, पंच शिरीष देसाई, दीनानाथ गावकर, गौतम सावंत, विंदा सावंत, साहाय्यक अभियंता देविदास गावडे, कनिष्ठ अभियंता बाबसेठ, जमिनदाते अन्नपूर्णा साने, ठेकेदार रामदास उसगावकर, दत्ता नाडकर्णी, खात्याचे पदाधिकारी, नागरिक उपस्थित होते.

मंत्री पाऊसकर पुढे म्हणाले, की साकोर्डा ही कलाकारांची भूमी असल्याने या परिसरात सांस्कृतिक भवन प्रकल्प बांधण्याच्या प्रस्तावाला चालना देण्यात येत आहे. मधलावाडा येथे १.५ एमएलडी क्षमता असलेला प्रकल्प बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाद्वारे दरदिवशी १५ लाख लिटर पाणी लोकांना उपलब्ध होणार असल्याने या परिसरातील लोकांची पाण्याची समस्या कायमची सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहे. पाण्याच्या प्रकल्पांसाठी निधी कमी पडणार नाही.

नवे, ओडकरवाडा आणि कुंभारवाडा या गावातील लोकांना पाण्याची तीव्र समस्या अनेक वर्षांपासून भेडसावत होती. याची पंचायत मंडळाने गंभीरपणे दखल घेऊन आमदारांच्या सहकार्याने उदळशे येथे ग्वालाशी विहिरीचे नियोजन करण्यात आले आहे. या विहिरीचे पाण्याचा समस्याग्रस्त भागातील गावात पुरवठा होणार असल्याने त्या गावातील लोकांची पाण्याची समस्या पूर्णपणे सुटणार असल्याचे सरपंच जितेंद्र नाईक यांनी यावेळी सांगितले.

दोन एनजीओविरोधात गुन्हा दाखल

संबंधित बातम्या