सासष्टीत बोट मालकांकडूनच मासळीची विक्री

Dainik gomantak
रविवार, 26 एप्रिल 2020

मडगावचे घाऊक व किरकोळ मासळी मार्केट बंद असल्याने कुटबण येथील मासळी या मार्केटात पाठवता येत नाही. ट्रॅालर मालक मासळीची आपल्या घरी नेऊन विक्री करत आहेत. मोबाईलवर संपर्क साधून हा व्यवहार करण्यात येत आहे.

मडगाव, 

परवानगी दिल्यानंतर कुटबण जेटीवरच्या ट्रॅालरद्वारे मासेमारी नियमितपणे सुरू, असून ट्रॅालर मालकांकडूनच मासळीची किरकोळ विक्री सुरू आहे. कुटबण, बेतुल, कोलवा, बाणावली आदी ठिकाणी बोट मालकांकडून मासळीची विक्री करण्यात येत आहे.0
मडगावचे घाऊक व किरकोळ मासळी मार्केट बंद असल्याने कुटबण येथील मासळी या मार्केटात पाठवता येत नाही. ट्रॅालर मालक मासळीची आपल्या घरी नेऊन विक्री करत आहेत. मोबाईलवर संपर्क साधून हा व्यवहार करण्यात येत आहे. तर काही मासळी गोव्यातील तसेच केरळ, कर्नाटकातील प्रक्रिया प्रकल्पात पाठवण्यात येत आहे.
ट्रॅालरवरून उतरवलेल्या मासळीचे वितरण करण्याची व्यवस्था नसल्याने सासष्टीतील जनतेपर्यंत मासळी योग्य पद्धतीने पोचत नाही. काही ठिकाणी मासळी मिळत असली तरी मासळीचे दर भरमसाठ असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
कुटबण येथील ट्रॅालरमधील मासळीची बेतुल, कुटबण, कोलवा, बाणावली आदी ठिकाणी विक्री करण्यात येत आहे. मडगाव, कुंकळ्ळी, सावर्डे, कुडचडे, केपे तसेच सासष्टीतील वेगवेगळ्या गावातून लोक कुटबण येथे येऊन मासळीची खरेदी करत आहेत, कुटबण येथे मासळी जेटीवर उतरवली जाते. कोलवा, बाणावली येथे समुद्रात ट्रॅालर नांगरून छोट्या होड्यातून मासळी किनाऱ्यावर आणली जाते, अशी माहिती एका ट्रॅालर मालकाने दिली.
ट्रॅालरच्या जाळ्यात सध्या बांगडे, इसवण, बुगडी, तोकयो, खापी, आदी मासळी सापडत आहे. कुटबण येथे बांगड्याचा दर २५० किलो असा आहे. इसवणचा दर आकारानुसार असून लहान आकाराचा इसवण ५०० रुपये किलो आहे, असे या ट्रॅालर मालकाने सांगितले.
कुटबण येथे लहान-मोठे मिळून सुमारे अडीचशे ट्रॅालर असून या ट्रॅालरवर साडेतीन हजार खलाशी आहेत. मासेमारीस परवानगी मिळाल्याने हे साडेतीन हजार खलाशी मासेमारीसाठी समुद्रात जात आहेत. त्यांचे कामही सुरु राहिले आहे. हे साडेतीन हजार खलाशी बेकार राहिले असते तर विविध समस्यांचा सामना करावा लागला असता, असे ट्रॅालर मालकाने सांगितले.

संबंधित बातम्या