अतिरेक्याच्या संशयावरून अटकेतील समीर सारदानाची खंडपीठात याचिका

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 3 मार्च 2020

समीर सर्दाना याची खंडपीठात धाव  

अजूनही त्याच्याविरुद्ध न्यायालयात आरोपपत्रही सादर करण्यात आलेले नाही. विविध तपास यंत्रणेने त्याची चौकशीवेळी केलेली सतावणूक याची माहिती देण्यासाठी सुनावणी खंडपीठाने चेंबरमध्ये घ्यावी तसेच विनाकारण संशय घेऊन पोलिस कोठडीत ठेवल्याप्रकरणी नुकसानभरपाई देण्याचे निर्देश द्यावेत अशी विनंती बाजू मांडली.

पणजी : चार वर्षांपूर्वी वास्को रेल्वे स्थानकाजवळ राहून दहशतवादी संघटनेशी संबंध ठेवून गुपित माहिती जमा करत असल्याच्या संशयावरून गोवा पोलिसांनी समीर सारदाना याला अटक केली होती.

वास्को न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केल्यानंतर त्याने त्याच्याविरुद्ध दाखल केलेल्या गुन्ह्याला विरोध करून मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका सादर केली आहे. ही याचिका आज सुनावणीस आली असता गोवा खंडपीठाने पोलिस खात्याला चौकशीची माहिती देण्याचे तोंडी निर्देश देऊन ही सुनावणी येत्या ९ मार्चला ठेवली आहे.

याचिकादार समीर सारदाना याने स्वतःच खंडपीठासमोर बाजू मांडताना त्याला जामीन देताना भारताबाहेर जाण्यासाठी न्यायालयाची परवानगी घेण्याची अट घातली आहे त्यातून मुक्त करावे. याचिकेत गोवा पोलिसांसह इतर केंद्रीय मंत्रालय व अधिकाऱ्यांना प्रतिवादी केले आहे. त्यामुळे गोवा खंडपीठाने सरकारी वकिलांना याप्रकरणाची स्थिती पुढील सुनावणीवेळी द्यावी असे तोंडी निर्देश दिले.

एका निवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे पुत्र असलेला याचिकादार समीर सारदाना याचा एका अतिरेकी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून गोवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले होते. विविध केंद्रीय तपास यंत्रणांनी त्याची चौकशी सुरू केली होती. त्याने वास्को न्यायालयात जामिनासाठी अर्ज केल्यानंतर त्याला सशर्त जामीन मंजूर करताना भारताबाहेर न्यायालयाच्या परवानगीशिवाय बाहेर न जाण्याची अट घातली होती.
 

संबंधित बातम्या