शंभरी पार कोरोना...

dainik gomantak
शुक्रवार, 5 जून 2020

कोरोनाचा प्रसार वाढत आहे ही चिंतेची गोष्ट आहे. एका मांगोरहिल-वास्कोमधील रुग्णांची संख्या ८० च्या वर गेली आहे. याचाच अर्थ गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. अजूनही बऱ्याच लोकांच्या चाचण्या व्हायच्या आहेत,न रुग्ण सापडले नाही म्हणजे मिळवले.

गोव्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या शंभरच्यावर गेली आहे. कोरोनाचे संक्रमण एवढ्या प्रमाणात गोव्यात होईल याचा कोणी विचारही केला नव्हता. पण हे सत्य आहे, वास्तव आहे. हे सामाजिक संक्रमण नाही, असे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांचे म्हणणे असले तरीही त्यातूकोरोनाचा प्रसार वाढत आहे ही चिंतेची गोष्ट आहे. एका मांगोरहिल-वास्कोमधील रुग्णांची संख्या ८० च्या वर गेली आहे. याचाच अर्थ गेल्या दोन दिवसांत कोरोनाचे रुग्ण मोठ्या संख्येने आढळले आहेत. अजूनही बऱ्याच लोकांच्या चाचण्या व्हायच्या आहेत,न रुग्ण सापडले नाही म्हणजे मिळवले. पण असे होऊ शकत नाही. कोरोनाचा प्रसार ज्या गतीने होत आहे ते पाहता रुग्णांची संख्या वाढणार आहे. सुदैवाने राज्यातील रुग्ण बरे होतात. आरोग्य खात्याच्या रोजच्या बुलेटिनवरून तरी हे स्पष्ट होते. राज्याबाहेरून आलेले लोक कोरोना घेऊन आले आणि त्याची बाधा आता स्थानिकांनाही होऊ लागली आहे. मुंबईतून आलेल्यांपैकी काहीजणांना कोरोना झाल्याची माहिती समोर आल्यानंतर महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्यांवर बंदी घालण्याचा विचार सुरू झाला होता, तशी मागणीही काही मंत्री करीत होते. मात्र लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात जवळजवळ सर्वच बंधने उठवण्यात आली आहेत. त्यामुळे नावापुरता लॉकडाऊन दिसत आहे. लोक तर बिनधास्तपणे वावरत आहेत. सर्व काही ठाकठीक असल्यागत व्यवहार सुरू आहेत. सुरवातीच्या काळात कोरोना बाधित रुग्ण सापडताच लोकांमध्ये प्रचंड भीती निर्माण व्हायची. मात्र त्यावेळचे दडपण आज जाणवत नाही. सर्व काही खुले होत आल्यानंतर कोरोनाचा प्रसार वाढणार हे गृहितच धरले होते. परंतु मांगोरहिलचा कोरोना अध्याय पाहता आणि राज्यात कळंगुट, दोनापावलासह अन्य ठिकाणी कोरोनाचे रुग्ण सापडल्यानंतर कोरोनारूपी राक्षस आता संपूर्ण गोव्यात थैमान तर घालणार नाही ना, अशी काळजी वाटायला लागली आहे. महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, कर्नाटकसारख्या राज्यात कोरोनाने दहशत माजवली आहे. त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारी यंत्रणा आणि आरोग्य खाते दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. परंतु कोरोनाचा प्रसार वाढतच आहे. यामुळे प्रत्येकाला स्वत:ची काळजी घ्यावी लागणार आहे. हलगर्जीपणा करून चालणार नाही. तसे झाले तर आपले आरोग्य धोक्यात येईल. आधीच गेले दोन-अडीच महिने आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण आला आहे. त्यात आणखी भर पडता कामा नये. सरकारनेही आता दक्षता बाळगायला हवी. काही मंत्री, आमदारांना मुख्यमंत्र्यांनी या साऱ्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी उपाय योजावेत असे वाटते. परंतु केंद्रीय गृहमंत्रालयाकडून येणाऱ्या सूचना आणि आदेशाची अंमलबजावणी करावी लागते. काही बाबतीत त्यात सवलत मिळू शकते. पण सरसकट सर्वच बाबतीत असे होऊ शकत नाही. केंद्र सरकारने घेतलेले निर्णय हे सारासार विचार करून घेतलेले असतात. ते राज्य सरकारला वाटले म्हणून अव्हेरता येत नाहीत. तरीसुध्दा राज्य सरकारने आता आणखी सावध राहायला हवे. कोरोनाचा प्रसार वाढला तर आपल्याकडे या सर्वांवर देखरेख ठेवण्याएवढी आरोग्य यंत्रणा आहे का, याचाही विचार व्हायला हवा. २०० व्हेंटिलेटर उपलब्ध केले जातील, असे सांगूनही तेवढे व्हेंटिलेटर अजूनही उपलब्ध नाहीत. खाटांची संख्याही मर्यादित असली तरी त्यांची पर्यायी व्यवस्था करता येते. बाहेरून येणाऱ्यांना रोखले म्हणून कोरोनाचा प्रसार बंद होईल, असेही नाही. मांगोरहिलमध्ये एवढे रुग्ण कसे, असा प्रश्‍न कोणालाही पडल्याशिवाय राहत नाही. मात्र या ठिकाणी रुग्ण आला कसा, तो कोठून आला याची शहानिशा प्रथम करायला हवी. तसेच तेथील लोकांचा कितीजणांकडे संपर्क आला, याचा अंदाज बांधणेही कठीण आहे. म्हणूनच हा धोका मोठा आहे. त्यासाठी सर्वांनी आपापली काळजी घ्यायला हवी. त्यात हयगय केली तर काही खरे नाही. जगभरात कोरोनामुळे लाखो लोख मृत्युमुखी पडले आहेत. भारतातही ही संख्या वाढत आहे. असे असताना आपण दक्ष राहिलो नाही तर संकटात सापडू. राज्यात कोरोनारूपी वणवा पेटला आहे, त्याचा भडका उडता कामा नये. कोरोनाचा आणखी प्रसार होऊ नये म्हणून सरकारने योग्य ती खबरदारी घ्यायला हवी. आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे कोरोनाचे विषाणू आणखी पसरू नयेत, तसेच अन्य रोगांचा प्रसार होऊ नये यासाठीची उपाययोजनाही तेवढीच महत्त्वाची आहे. सारे काही सरकार करेल, आम्ही बिनधास्तपणे सर्वत्र फिरू, अशा भ्रमात कोणी राहू नये. कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, आपल्यापर्यंत हा रोग पोचू नये असे वाटत असेल तर सामाजिक अंतर राखायला हवे, मास्क घालायला हवा आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपणच आपले रक्षक व्हायला हवे. असे झाले तर कोरोनाचा विषाणू रोखला जाईल आणि आपल्याला मोकळा श्‍वास घेता येईल.

संबंधित बातम्या