नवी दिशा: ‘ॲप्स’मधून शिका कला-कौशल्य

प्राची नाईक
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

कला शिकण्यात अनेक संस्था मदत करतात. संगीत, नृत्य, पाककला, शिवणकला, भरतकाम, चित्रकला, डिझायनिंग, खेळ अशाप्रकारचे विविध वर्ग घेतले जातात. परंतु ''स्मार्टफोन''च्या काळात लोकांसाठी कौशल्ये वाढविण्याची किंवा काहीतरी नवीन शिकण्याची ॲप्स एक नवा ‘ट्रेण्ड’ बनली आहे ज्याकडे बहुतेक लोक वळत आहेत.

काम मिळविण्यासाठी महाविद्यालयीन पदवी महत्त्वाची असते तरीही आपल्या पदरी या पदवीशिवाय आणखी काही कला कौशल्य गरजेचे आहे असे प्रत्येकाला वाटते. कठीण परिस्थितीत हीच कला आपले पोट भरू शकते याची प्रचिती अनेकांना या महामारीच्या दिवसांत आली. अशावेळी या कला शिकण्यात अनेक संस्था मदत करतात. संगीत, नृत्य, पाककला, शिवणकला, भरतकाम, चित्रकला, डिझायनिंग, खेळ अशाप्रकारचे विविध वर्ग घेतले जातात. परंतु ''स्मार्टफोन''च्या काळात लोकांसाठी कौशल्ये वाढविण्याची किंवा काहीतरी नवीन शिकण्याची ॲप्स एक नवा ‘ट्रेण्ड’ बनली आहे ज्याकडे बहुतेक लोक वळत आहेत.

अशा ॲप्समधील एक म्हणजे ''कोर्सेरा''. ''कोर्सेरा''वर प्रोग्रामिंग, कला आणि डिझाईन, विज्ञान, व्यवसाय तसेच इतर विषयांसाठी ३५०० ऑनलाईन-लर्निंग कोर्सेस उपलब्ध आहेत. यात व्हिडिओ प्रशिक्षण, चर्चासत्रे आहेत. काही अभ्यासक्रम तर यावर विनामूल्य उपलब्ध आहेत. आजकाल बहुतेक युवक राज्य किंवा परदेशात जावून काम करणे पसंत करतात. इंग्रजी ही सार्वत्रिक वापरली जाणारी भाषा असली तरीही त्या प्रांताच्या भाषेचे थोडेफार ज्ञान असणे केव्हाही चांगले. पारंपरिक पद्धतीने आम्ही जर या भाषा शिकायला गेलो तर यात मुबलक वेळ जातोच. अशावेळी ''ड्युओलिंगो'' सारखे ॲप आपल्याला मदतीचा हात देतात. ''ड्युओलिंगो''मध्ये वापरत असलेली पद्धत आपण शिकण्यासाठी निवडलेली कोणतीही भाषा समजून घेणे आपल्यास सुलभ करते. प्रत्येक भाषेचे धडे वेगवेगळ्या चरणांमध्ये विभागले गेले आहेत. यात वापरली जाणारी दृश्य, परस्परसंवादी आणि खेळासारखे स्वरूप शिक्षण मजेदार आणि तणावमुक्त करते. आपण यामध्ये दररोज किती वेळ घालवायचा हे आपण स्वतः ठरवू शकता. याची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ती विनामूल्य आपल्या प्ले-स्टोअरवर उपलब्ध आहे.

गृहिणी, मुलींना विणकाम, भरतकाम, शिवणकाम करण्याचा छंद असतोच. काहीजण नुसता छंद म्हणून जोपासतात तर काही जण यातून स्वतःचा व्यवसायही करतात. ''क्राफ्ट्सी'' या ॲपमध्ये बागकाम, रजाई करणे, शिवणकाम, स्वयंपाक इत्यादी विविध हस्तकलांमध्ये अनेक ऑनलाईन अभ्यासक्रम उपलब्ध आहेत. त्यामुळे घरी बसल्या बसल्या महिला आता वेगवेगळी कौशल्य शिकू शकतात. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ही कला कुठल्याही परिस्थितीत वाया जात नाही. अनेक महिला याच कलेवर स्वतःचे मोठमोठे व्यवसाय चालवत आहेत. या सोबत ''हूनर'' हे ॲपदेखील अशाच कलेत प्रशिक्षण प्रदान करते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या