उत्कर्षासाठी प्रत्येकाचे योगदान हवे

मांगिरीश पै रायकर
शुक्रवार, 14 ऑगस्ट 2020


एखाद्याला संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने करता आले पाहिजे. जगाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या सर्व वस्तू व गोष्टींचे उत्पादन सुरू करण्याची क्षमता भारतात आहे. देशामध्ये थेट विदेशी गुंतवणूक आणण्याचीही ही एक चांगली संधी आहे. आम्ही आपली सर्व ऊर्जा या दिशेने कार्यान्वित केल्यास ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम एक बरीच उंच झेप घेऊ शकतो.

- मांगिरीश पै रायकर

आज देशातल्या प्रत्येक माणसासाठी कोविड - १९ महामारीने जगणे मुश्किल करून ठेवले आहे. आपले राज्यही याला अपवाद नाही. सुरुवातीच्या काळात लॉकडाउन सुरू झाला ज्यामुळे सर्व अर्थव्यवस्थाच खिळखिळी होऊन बसली. प्रत्येकालाच आपल्या जिवाची काळजी असल्यामुळे सर्वांनी घरी बसणेच पसंत केले. स्थलांतरीत मजूरही आपल्या घरी, आपापल्या गावी, शहरात व राज्यात परत गेले. या महामारीने सगळीकडे आपली एक भीती निर्माण केली. यापूर्वी कधीही अशी परिस्थिती ओढवलेली नव्हती आणि लोकांना काम न करता घरी बसणेही भाग पडले नव्हते. ही परिस्थिती रोजंदारीवर काम करणारे कामगार, विक्रेते, सेवा कामगार आणि अशा अनेकजणांसाठी फारच कठीण व बिकट स्थिती निर्माण करणारी होती. कारण हे सर्व कष्ट करून मिळणाऱ्या पैशांवर रोजचा पोटापाण्याचा प्रश्न त्या दिवसापूरता सोडवत होते. त्यांच्याकडे असलेली पुंजी ४० दिवसांच्या आत हातात काही काम नसल्याने शेवटी संपून गेली. सरकारने रोजंदारी करून कमावत्या लोकांना आणि स्थलांतरीत मजूरांना शिधाधान्य देऊन त्यांची अडचण कमी करण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर काही दानधर्म करणाऱ्या सेवाभावी संस्थांनीही पुढे होताना काही ठिकाणी मजूर व कामगारांना मदत केली.
अर्थव्यवस्थेचे पुनरुज्जीवन करणे हा येणाऱ्या काळात एक मोठा प्रश्‍न असेल. २०२०२ हे वर्ष जगण्यासाठीच्या धडपडीचे वर्ष ठरणार आहे. मग भविष्यकाळासाठी कमावून ठेवणे बाजूलाच राहिले. तरीही औद्योगिक क्षेत्र आणि उद्योग धंदे व्यवसाय उघडले गेल्यामुळे परिस्थिती नियंत्रणत येण्यास काही प्रमाणात हातभार लागला. पण सगळे काही सर्वसामान्य स्थितीमध्ये येण्यासाठी अजून बराच वेळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये हातात खेळणारा पैसा कमी झाल्याने जीवनावश्यक वस्तू घेण्यालाच प्राधान्य देण्याकडे कल पाहायला मिळत आहे. मौल्यवान वस्तू, जसे की वाहने, उंची सामान, कपडे, चपला, सुखसोयीच्या वस्तू विकत घ्यायला महत्त्व दिले जाणार नाही आणि त्यामुळे असे सामान विकणारे हे ग्राहक मिळत नसल्याने अडचणीत येतील. रियल इस्टेट मार्केटही आता हळूहळू जमिनीवर येईल. बँका व इतर आर्थिक संस्थांना येत्या काही वर्षांत महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. उत्पन्न तेवढे मिळणार नसले तरीही अर्थव्यवस्थेचे चाक फिरत ठेवणे एक प्रमुख वैशिष्ट्य वा आवश्यकता ठरणार आहे. किम वू चूग यांनी लिहिलेल्या "एव्हरी स्ट्रीट इज पेव्हड विथ गोल्ड" या शीर्षकाच्या पुस्तकामध्ये, इच्छा आणि कल्पकता, विकास आणि वाढ कशी आणू शकते हे स्पष्ट केलेले आहे. त्यांनी असे नमूद केलेले आहे की ‘जेव्हा अर्थव्यवस्था खाली येईल तेव्हा यशाची शिडी चढून वर जायला तयार व्हा’. असे म्हणतात की आपण संकटातून तेव्हाच तरून जाऊ शकतो जेव्हा आपण पंख सरसावून उडणासाठी तयार होतो. आम्हाला आशेची किरणे व संधी शोधता आल्या पाहिजेत. महामारीमुळे चीनमधील उद्योग व्यवसाय बंद पडले होते. आंतरराष्ट्रीय दबावामुळे इतरांना संधी मिळण्याची शक्यता होती. भारतातील मध्यम व लघु उद्योग क्षेत्राने हे आव्हान स्वीकारले आणि सरकारच्या मदतीने लॉकडाउनच्या काळात कोविड संबंधित उत्पादने जसे की पीपीई किटस, सर्जिकल आणि इतर पद्धतीचे मास्क, व्हेंटिलेटर आणि औषधे यांचे उत्पादन सुरू केले आणि विक्री होऊन अतिरिक्त प्रमाणात राहिलेल्या उत्पादनांची निर्यातही केली.
एखाद्याला संधीचा फायदा घेऊन त्याचे सोने करता आले पाहिजे. जगाच्या ज्या ज्या गरजा आहेत त्या सर्व वस्तू व गोष्टींचे उत्पादन सुरू करण्याची क्षमता भारतात आहे. देशामध्ये थेट विदेशी गुंतवणूक आणण्याचीही ही एक चांगली संधी आहे. आम्ही आपली सर्व ऊर्जा या दिशेने कार्यान्वित केल्यास 'मेक इन इंडिया ' हा उपक्रम एक बरीच उंच झेप घेऊ शकतो. पण सर्व प्रणाली व्यवस्थित जागेवर तयार असणे आणि आपण दृष्टीकोनाने कार्यप्रवण असणे अगत्यचे आहे. सरकारचा दृष्टिकोन आणि कृती सकारात्मक असावी. केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यामधला एकोपा बाहेरून दिसला पाहिजे ज्याच्यामुळे एकसंधतेची आणि स्थिरतेचे चित्र गुंतवणूक करणाऱ्याच्या मनात तयार होऊन भारत हेच अंतिम स्थान म्हणून शिक्कामोर्तब करणारा आत्मविश्वास त्याच्यामध्ये निर्माण होईल.

अशा परिस्थितीत गुंतवणूक ही अर्थव्यवस्थेला वेगाने पुनरूज्जीवित करण्यासाठी मदत करू शकते आणि महत्त्वाचे म्हणजे त्याच्यामुळे रोजगार निर्माण होईल जी सध्या काळाची गरज आहे. उद्योगाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सोपी होण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने एकत्र येऊन काम करण्याची गरज आहे. उद्योजकता सुसह्यता (इज ऑफ डुर्ईंग बिजनेस ) हे लालफितीचा कारभार कमी केला आणि भ्रष्टाचार पूर्ण नष्ट केला तरच खऱ्या अर्थाने साधली जाऊ शकते. वेगाने प्रतिसाद देण्याची आणि आवश्यक ती पायाभूत सोयीसुविधा उभारण्याची तयारी मात्र हवी. लॉजिस्टिक आणि युटिलिटी सर्विसेस देण्याला महत्त्व दिले गेले पाहिजे जे परकीय गुंतवणुकीला आकर्षित करणारी एक गुरुकिल्ली ठरू शकेल. आधार प्रणालीला बराच वाव असणार आहे. नव्या गुंतवणुकीचे स्वागत करण्यासाठी या दिशेने होणारे काम हे अतिशय वेगाने करावे लागणार आहे. कौशल्यपूर्ण मनुष्यबळ विकसित करणे हे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे.
नवीन कार्यक्षम जागा निर्माण करण्यासाठी बऱ्याच संधी असणार आहेत. मेट्रो शहरांना जोडण्यासाठी नवीन कोरीडोर बांधले जात आहेत. हे रस्ते नवीन भागातून आणि प्रदेशांतून जातात. जे आयात पर्यायी क्षेत्र, निर्यात प्रसार क्षेत्र म्हणून भविष्यकाळात विकसित करता येणार आहेत.

संबंधित बातम्या