गोवा ग्रीन झोन : ख़ुशी कम धोका जास्त

Dainik Gomantak
मंगळवार, 5 मे 2020

सर्रास अनेक लोक ऑन लाईन पास काढून येत आहेत. अशा लोकांना खरेच गोव्यात येण्याची गरज आहे का हे पाहून त्या लोकांना परवानगी द्यावी. अन्यथा सरकार ‘विकतचे दुखणे अंगावर ओडून घेणार आहे.’

दत्ता शिरोडकर

‘कोरोना व्हायरस’ च्या विरोधात गोवा राज्य सरकारने राबवलेल्या विविध उपाययोजना आणि बाधित रुग्णांची संख्या शून्यावर आल्याने केंद्र सरकारने दोन दिवसापूर्वी गोव्याला ‘ग्रीन झोन’मध्ये समाविष्ट केले असल्याचे जाहीर केले आहे.गोव्याचे दोन्ही जिल्हे कोरोनाबाबत सुरक्षित असल्याचे केंद्र सरकारच्या यादीत नमूद केले आहे.मुख्यमंत्री प्रमोद सावंत बरोबर आम्हालाही आनंद झाला आहे.पण ‘ग्रीन झोन’ नंतर अनेक
समस्या निर्माण होवू शकतात.त्याची काळजी घेणे हे आम्हा सर्वसामोराचे मोठे आवाहन आहे.‘ग्रीन झोन’चा दर्जा मिळाल्याने गोव्यावरील कठोर नियमांत शिथिलता करण्यात आली आहे.त्याचाच फायदा घेवून अनेक बडी अस्थी गोव्यात यायला लागले आहेत.त्यात गोवा हे पर्यटक राज्य असल्याने अनेक बड्या  हस्तीनी येथे ‘सेकेंड होम’ म्हणून मोठ मोठ्ये बंगले,व्हिला घेवून ठेवले आहेत. कोरोना व्हायरस बाबतीत सुरक्षित असल्याने
त्यांनी मोर्च्या गोव्याच्या दिशेने वळविला आहे.सर्रास अनेक लोक ऑन लाईन पास काढून येत आहेत. अशा लोकांना खरेच गोव्यात येण्याची गरज आहे का हे पाहून त्या लोकांना परवानगी द्यावी. अन्यथा सरकार ‘विकतचे दुखणे अंगावर ओडून घेणार आहे.’अशा लोकामुळे कोरोना व्हायरस पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता नाकारता येत नाही. सरकारने गोव्यातील सर्व चेक पोस्ट वर कडक यंत्रणा ठेवून यावर लक्ष ठेवले
पाहिजे.सरकार अशा लोकांच्या कोरोना टेस्टबाबत गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.घाई गडबडीत टेस्ट केल्या जात आहेत.जर टेस्ट नकारात्मक आली तर त्यांना होम कोरनटाईन करण्यास सांगितले जाते.अशा होम क्वारंटाईन केलेल्या लोकावर देखरेख ठेवण्यासाठी सरकार जवळ पुरेसे मनुष्यबळ नसल्याने हे लोक गाव भर
हिंडताना दिसत आहेत.ज्याची प्रतिकार शक्ती चांगली असते त्याच्यावर कोरोना विषाणूचा काहीच परिणाम होत नाही.पण जर एखाद्या कमजोर प्रतिकार शक्ती असलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आला तर त्याला बाधा होवू शकते.त्याची काहीच चूक नसताना त्याला जीव गमावण्याची पाळी येवू शकते.त्यासाठी सरकारने परराज्यातून
येणाऱ्या लोकावर करडी नजर ठेवायला पाहिजे आणि त्याच्या बाबतीत सक्त नियमांची अंमलबजावणी केली पाहिजे.नाही तर आम्हाला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील.
गोवा सुरक्षित आहे तो सुरक्षितच राहू दे यासाठी हा सगळा खटाटोप आहे.सरकारने चेक पोस्ट वरच्या पोलिसांना नियमांचे सक्त पालन करण्याचा आदेश द्यावेत.एकही बाधित व्यक्ती गोव्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.पर्वरी परिसरात अशा लोकांचे अनेक बंगले असून सद्या हे बंगले गजबजू लागले आहेत.बड्या अस्थिनीही समाजहित डोळ्यासमोर ठेवून सद्या जेथे आहे तेथेच काही काळ राहावे.स्वतः हॉलिडे
इंजोय करण्याच्या नादात सामान्य लोकांचा जीव धोक्यात घालत नाही ना? याचे भान प्रत्येकाने ठेवावे.प्रत्येकाने सरकारने घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच स्थानिक लोकांनी सुद्धा आपल्या परिसरात नवीन माणूस राहायला आला तर त्याची बातमी स्थानिक पोलिसांना द्यावी.जेणे करून आम्ही सुरक्षित राहू शकतो आणि गोवेकरही मोकळा श्वास घेवू शकेल.

संबंधित बातम्या