सांग्याच्या नगराध्यक्षांचा राजीनामा

Dainik Gomantak
बुधवार, 29 एप्रिल 2020

पालिका निवडणुकीला आता केवळ पाच महिने शिल्लक असताना नगराध्यक्ष पदाचा रुमाल्डो फर्नांडिस यांनी राजीनामा दिल्याने नेमके कारण काय हे कळू शकले नाही

मनोदय फडते

सांगे

 

सांगेचे विद्यमान नगराध्यक्ष रुमाल्डो फेर्नांडिस यांनी आपल्या नगराध्यक्षपदाचा मंगळवारी पालिका संचालक तारिक थॉमस यांच्याकडे नगराध्यक्षपदाचा राजीनामा केला. नगराध्यक्ष रुमाल्डो फर्नांडिस यांनीच ही माहिती दिली.
सांगे पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून गेल्या बावीस महिन्यांपासून कारभार सांभाळला होता. विद्यमान पालिका मंडळाने करार पद्धतीने नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष पद भूषविण्याचे ठरले होते. नवीन पालिका मंडळ सत्तास्थानी येताच केरोज क्रूज नगराध्यक्ष बनले. त्यांचा कार्यकाळ संपताच सूर्यदत्त नाईक यांनी पदभार सांभाळला. त्यानंतर रुमाल्डो फर्नांडिस हे नगराध्यक्ष बनले. असे जरी असले तरी पुढे नगराध्यक्ष कोण होणार हे नक्की होत नसल्याने नागरध्यक्षपदाचा पदभार रुमाल्डो फर्नांडिस यांच्याकडे कायम राहिला.
पालिका निवडणुकीला आता केवळ पाच महिने शिल्लक असताना नगराध्यक्ष पदाचा रुमाल्डो फर्नांडिस यांनी राजीनामा दिल्याने नेमके कारण काय हे कळू शकले नसले तरी आपण स्वेच्छेने पदत्याग केल्याचे फर्नांडिस यांनी स्पष्ट केले आहे. आता शिल्लक कालावधी साठी कोण नगराध्यक्ष बनणार हे लवकरच कळणार आहे.

 

 

संबंधित बातम्या

Tags