गोवा: सरणावर जाण्यास मृतदेहांना करावी लागतेय प्रतीक्षा

Corona deaths have increased in Goa.
Corona deaths have increased in Goa.

एखाद्याचा मृत्यू (Death) झाल्यावर त्याला सरण रचण्यासाठी जागा मिळण्यात अडचण येणे, असे प्रकार गोव्यात अनेकदा अनुभवास येतात. आता मात्र कोरोनाच्या तांडवामुळे मृत्यू पावणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली असल्याने स्मशानमूमीही ‘फुल्ल’ (Full) झालेल्या आढळून येतात. सरणावर जाण्यास मृतदेहांना प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे. कोरोनाने (Corona) सगळीकडे थैमान घातले आहे; अनेकांचा मृत्यू होत आहे, त्यामुळे स्मशानभूमीही ‘व्यस्त’ आहेत. स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यासाठीही वेळ घ्यावी लागत आहे. ही गोव्यातील स्थिती आहे. (Corona deaths have increased in Goa.)

मांद्रे येथील एका व्यक्तीचे शुक्रवारी हदयविकाराच्या धक्क्याने निधन झाले. मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा शोधत असताना स्मशानभूमी केवढ्या व्यस्त आहेत याची जाणीव तेथील नागरिकांना झाली. अंत्यविधीसाठी जागेची कमतरता असल्याने सार्वजनिक स्मशानभूमीत मृतदेह नेण्याचा निर्णय झाला. प्रथम पेडणे येथील सार्वजनिक स्मशानभूमीत चौकशी केली, परंतु तिथल्या जागेवर दोन अंत्यविधी पार पडलेले आहेत व त्यांची चिता थंड झालेली नव्हती म्हणून म्हापसा येथे चौकशी केली असता असे कळले की स्मशानभूमीत शुक्रवारी अनेक मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत. तिथे मृतदेह घेऊन येतो, अशी विनंती मृत व्यक्तीच्या नातेवाइकांनी केली.

स्मशानभूमी समितीचे एक ट्रस्टी किरण शिरोडकर यांच्या प्रयत्नाने अंत्यसंस्कारासाठी वेळ मिळाली. पाच वाजता मृतदेह घेऊन येण्यास सांगितले गेले. तिथे अंत्यविधीचे व्यवस्थापन करणाऱ्या व्यक्तीने सांगितले की दिवसभर येथील स्मशानभूमीत पाच मृतदेह आले; आणखी दोन मृतदेह आणले जाणार आहेत, त्यामुळे वेळ आखून दिलेली होती. मृतदेहांनाही चिता शांत होईपर्यंत प्रतीक्षा करावी लागते, हे दुर्दैवी. अजून एक गोष्ट अशी आहे की राज्यातील काही स्मशानभूमींमध्ये अंत्यसंस्कार झाल्यानंतर ‘रक्षा’ (अस्थी) तापलेल्या चितेतूनच न्याव्या लागत आहेत. नंतर तिथे दुसऱ्या मृतदेहासाठी जागा करून देण्याची वेळ कोविडमुळे वाढणाऱ्या मृत्यूंनी आणली आहे. 

सर्वजण सध्या बिकट परिस्थितीतून जात आहेत. परंतु अशा बिकट परिस्थितीमध्येसुद्धा धैर्य दाखवणे गरजेचे आहे. त्यामुळे सर्वांनी एकमेकांना मदत करून अशा प्रसंगावर मात करणे एवढेच आपल्या हाती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com