कोरोना, बेरोजगारी आणि युवा

कोरोना, बेरोजगारी आणि युवा
कोरोना, बेरोजगारी आणि युवा

शरीराने सुदृढ, सक्रिय असलेली युवा पिढी मानसिकतेने ढासळलेली आहे. नंतर पैसे मिळावी म्हणून काहीही करण्यास ही युवा पिढी तयार होते. अमली पदार्थांचा व्यवहार खुलेआम गोव्यात होत आहे यात जास्त असे गोमंतकातील युवा गुरफटलेले आहेत. ते का? याचा गहन विचार सरकारने कधी केला आहे का? त्यांना नोकरी पाहिजे, ते नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्या हाका सरकारला कधी ऐकू येईल?

नोकरी ही प्रत्येकाच्या आयुष्यात महत्त्वाची गोष्ट आहे. लहानपणापासून प्रत्येक मुलांचं स्वप्न असतं की "मी मोठा होऊन नोकरी करणार व आई वडिलांना सांभाळणार" पण वर्तमान काळात सगळ्या युवकांचा या बाबत हिरस्मुड झाला.

मागचे सरकार जेव्हा सत्तेवर होते तेव्हा सरकारी खात्यात नोकरभरती  होणार होती परंतु आचारसंहिता लागू करून नोकरभरतीस स्थगिती देण्यात आली. त्यापासून आजपर्यंत नुसती सरकारी नोकरभरतीपासून सरकारने पळवाट काढली आहे. हल्लीच जानेवारी महिन्यात नोकरभरती बाबत दिलासादायक वार्ता यायच्या.  काही खात्यात लेखी परीक्षा ही झाल्या होत्या. पण कोरोनाच्या महामारीमुळे त्यालाही स्थगितीचे रूप मिळाले. आणि  नंतर चक्क "यावर्षी नोकरभरती होणं शक्य नाही" असे सरकारने सांगून त्याला या वर्षापुरता पूर्णविराम लावला. कोरोना च्या विळख्यात अर्थव्यवस्था आल्याने सरकार नोकर भरती करण्यास असफल राहिला आहे. पण काहीही का असेना कोरोनाचे निमित्त सांगून सरकार नोकर भरती पासून पळवाट तर काढत नाही ना?

सरकारचे असे म्हणणे  की युवांना फक्त सरकारी नोकरीवर अवलंबून न राहता स्वतःचा व्यवसाय करावा यासाठी सरकार लागेल त्या योजना लागू करून मदत करील पण व्यवसाय करणे अवघड आहे तो सर्वांनाच जमतोच असं काही नाही. प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपला मुलगा/मुलगी चांगल्या नोकरीवर कार्यरत असावेत परंतु आत्ताच्या काळात ते अशक्य होत चाललेले आहे. विविध प्रोफेशनल कोर्स आहेत त्यात आपल्या मुलांनी प्रावीण्य मिळवून नोकरी करावी म्हणून किती तरी आई वडील हाल अपेष्टा काढून त्यांना शिकवितात. का तर त्यांच्या मुलांनी व्यवसाय करावा अशीच त्याची एकमेव इच्छा होती म्हणून? व्यवसाय करणे ही एक कला आहे. ज्याला उमगली त्यालाच जमेल. "जो तरंगला तो तरंगला आणि बुडाला तो बुडाला" कारण व्यवसाय करणे सर्वांना जमत नाही.

डी. एड.च्या शिक्षकांची नोकरभरती व नियुक्ती करण्यात आली परंतु बी. एड झालेले युवक युवती अजून प्रत्येक विद्यालयाचे नोकरीसाठी दार ठोठावत आहेत. 

सरकारी नोकर भरतीस विशिष्ट अशी वयोमर्यादा असते खास करून पोलीस. पाच वर्षे उलटून गेली तरीही या खात्यात नोकर भरती झालेली नाही . युवकांची वर्षे उलटून जातात. वय झालेल्या उमेदवारांना सरकार नोकरी  देईल का? शिक्षण खाते, अग्निशामक दल, कारकून, पोलीस खाते, वन विभाग, वीज खाते अशा विविध खात्यात नोकर भरती झाली नाही. गोव्यातील युवा नोकरीच्या प्रतीक्षेत आहे. त्यांनी आणखी किती काळ प्रतीक्षा करावी? आणखी किती दिवस सरकार त्यांना आमिषांवर नाचवणार?

सरकारी नोकरी म्हणजे सुरक्षित नोकरी हे सर्वानाच माहीत आहे. आजकाल मुलीला नवरा सुध्दा शोधत असताना तो सरकारी खात्यात नोकरी करतो का? हे पहिल्यांदा विचारण्यात येत. खासगी नोकरी करणाऱ्या मुलांना मुली देण्यास आई वडील टाळाटाळ करतात.

कितीतरी युवक या बेरोजगारीमुळे व्यसनाकडे चाललेले दिसत आहेत. शरीराने सुदृढ, सक्रिय असलेली युवा पिढी मानसिकतेने ढासळलेली आहे. नंतर पैसे मिळावी म्हणून काहीही करण्यास ही युवा पिढी तयार होते. अमली पदार्थांचा व्यवहार खुलेआम गोव्यात होत आहे यात जास्त असे गोमंतकातील युवा गुरफटलेले आहेत. ते का? याचा गहन विचार सरकारने कधी केला आहे का? त्यांना नोकरी पाहिजे, ते नोकरीच्या शोधात आहेत. त्यांच्या हाका सरकारला कधी ऐकू येईल?

कोरोनाची धास्ती आता सर्वांनाच लागली आहे. कोरोना आणखी किती काळ सोबत चालणार आहे याची शाश्वती कुणालाच देता येणार नाही. वास्तविक स्थिती पाहता गोव्याला तरी तेवढी आर्थिक हानी झालेली नाही. कारण थोडा काळ का होईना खाण व्यवसाय सुरू करण्यात आला होता आणि लॉकडाऊन ही काही काळ मर्यादित होतं. केंद्रीय सरकारकडून आर्थिक मदत पण करण्यात आली होती. कोरोनाचा वाढता फैलाव पाहता आणखीही त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होऊ शकतो पण मग का ही नोकरभरती सरकार त्यामुळे अशीच लांबणीवर टाकणार आहे का?

आज अनेक लोक आहेत जे खासगी नोकरी करायचे त्यांना कोरोनामुळे नोकरी सुद्धा गमवावी लागली आहे अशा लोकांचे काय? कोरोनाचा जास्त त्रास सामान्य माणसाला झाला आहे नोकरी अभावी माणसाला जगणे कठीण झाले आहे. कोरोनाच्या भितीबरोबर पोटाची भीती वाढली आहे. कोरोनामुळे आम्ही उपाशी राहू शकत नाही. कोरोनामुळे घरोबा सोडून चालणार नाही त्यामुळे घरातील पुरुषाला चार पैसे कमवावे लागतात. ते कमावणार कसे?  सरकार कोरोनाच्या काळात विविध पैलूवर विचार करू शकते तर नोकर भरतीवर का नाही?

शिकून सवरून आजची मुले घरात आहेत. जिथे तिथे नोकरीच्या शोधात आहेत. "कुणी नोकरी देता का नोकरी" अशी परिस्थिती युवांवर ओढवलेली आहे. घरातील कर्ता पुरुष/स्त्री बनायच्या काळात सरकार नोकरी देण्यास अपयशी ठरत आहे. युवांच्या मागण्या पुरवण्यात  कमी पडत आहे. नोकर भरतीवर पुन्हा विचार  करावा आणि युवांना कृतकृत  करावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com