राज्यात विलिनीकरणवादीच आज चालवतात सरकार: सरदेसाई

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सासष्टी:जनमत कौल लढ्यात ५४ टक्के गोमंतकियांनी गोव्याचा बाजूने मतदान केले होते, तर गोव्याला महाराष्ट्रात विलीन करण्यासाठी ४३ टक्के लोकांनी मतदान केले होते.गोव्याला महाराष्ट्र राज्यात विलीन करण्यासाठी प्रयत्न करणारे ४३ टक्के लोक आज सरकार चालवीत असल्यामुळे ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेला जनमत कौलदिन राज्य पातळीवर साजरा करण्यात येत नाही,तसेच जनमत कौल चळवळीचे नेते डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यास अडथळा निर्माण होत आहे,असा आरोप गोवा फॉरवर्ड पक्षाचे नेते तथा फातोर्डाचे आमदार विजय सरदेसाई यांनी केला.

फातोर्डा येथील जनमत कौल चौकाजवळ आयोजित केलेल्या जनमत कौल- रिकनेक्ट कार्यक्रमात सरदेसाई प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते.यावेळी मडगावच्या नगराध्यक्ष पूजा नाईक,गोवा फॉरवर्ड पक्षाचे उपाध्यक्ष प्रशांत नाईक, कार्मेल महाविद्यालय इतिहास विभागाच्या मुख्य प्राध्यापक लैला रिबेलो,मडगाव पालिकेचे नगरसेवक लिंडन परेरा, ग्लेन आंद्राद, कार्मेल महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते.जनमत कौल लढ्यात गोमंतकीय लोक गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा देण्यासाठी प्रयत्न करीत होते,गोव्यात राहणारे काही लोक गोवा महाराष्ट्रात गोवा विलीन करण्यासाठी प्रयत्न करीत होते, तर काही लोक गोवा कर्नाटकात विलीन करण्याचाही प्रयत्नात होते. आता काही लोक दोडामार्गाला गोव्यात विलीन करण्यासाठी प्रयत्न करीत असून ५४ टक्के गोमंतकीयांना अल्पसंख्याक बनविण्याचा हा प्रयत्न असू शकतो.कारण कोकणी भाषेसाठी ज्या ज्यावेळी आंदोलन पुकारलेली आहेत, त्या त्यावेळी या ४३ टक्क्याचा या सरकारमधील लोकांनी गोमंतकीयांच्या विरोधात काम केले आहे, असे सरदेसाई यांनी सांगितले.
जनमत कौल चळवळीचे नेते डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार उद्या या पुतळ्याची पायाभरणी करण्यात येणार होती. परंतु, पुतळा उभारण्यासाठी घेतलेल्या ठरावास कॉंग्रेस आणि भाजप पक्षाचे समर्थन असलेल्या नगरसेवकांनी पालिका प्रशासनाकडे आव्हान केल्यामुळे पुतळा उभारण्याची प्रक्रिया रखडली आहे. पालिका प्रशासनाकडून यासंबंधी अद्याप कुठल्याही प्रकारचा निर्णय घेण्यात न आल्यामुळे पालिका यावर पुढील निर्णयही घेऊ शकत नाही, असे सरदेसाई यांनी सांगितले. जनमत कौल दिवसाला ऐतिहासिक दृष्ट्या महत्त्व प्राप्त झालेले आहे. तरीही राज्य स्तरावर हा दिन साजरा होत नाही, तसेच डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभारण्यासही मान्यता न मिळणे, हे सर्व सरकारमध्ये असलेल्या ४३ टक्के लोकांमुळे होत आहे. पंडित नेहरुंवर काही लोक टीका,परंतु नेहरुंना काहीही म्हटलेले खपवून घेणार नाही,असे सरदेसाई यांनी सांगितले.

बोरीत पट्टेरी वाघाचा संचार
विजय सरदेसाई यांनी घेतलेल्या प्रयत्नामुळे जनमत कौल चौक उदयास आला आहे, त्याचप्रमाणे डॉ. जॅक सिक्वेरा यांचा पुतळाही उभारण्यासाठी प्रयत्न करतील, असे पूजा नाईक यांनी सांगितले. या कार्यक्रमात प्रशांत नाईक यांनी जनमत कौलाचे महत्त्व उपस्थित विद्यार्थ्यांना पटवून दिले.

संबंधित बातम्या