मामलेदार कार्यालयात दलालांना प्रोत्साहन नाही.

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मामलेदार सतीश प्रभू यांची माहिती.विविध दाखले मिळविण्यासाठी जे लोक अर्ज करतात त्यांच्याच हाती दाखले देण्यास संबंधित कर्मचाऱ्यांना बजावले आहे,असे प्रभू यांनी सांगितले.

मुरगाव: निवासी आणि मिळकतीचा दाखला मिळविण्यासाठी मुरगाव मामलेदार कार्यालयात दलालांच्या मदतीने मोठ्या रकमेची लाच द्यावी लागते, अशा वाढत्या तक्रारी जनतेच्या असल्याने आपल्या कार्यालयात दलालांना प्रवेशबंदी असल्याची माहिती मुरगावचे मामलेदार सतीश प्रभू यांनी दिली.

मुरगाव मामलेदार कचेरीत दलालांची संख्या वाढली असून त्यांच्या मदतीने मामलेदार कचेरीतील कर्मचाऱ्यांना लाच दिल्याशिवाय निवासी आणि मिळकतीचा दाखला मिळत नाही, असे वृत्त दै. ‘गोमंतक’मधून प्रसिद्ध होताच सर्व दलाल पसार झाले.या वृत्ताच्या अनुषंगाने बोलताना मामलेदार सतीश प्रभू यांनी आपल्या कार्यालयात दलालाकरवी आलेल्या कामांना प्रोत्साहन दिले जात नाही.सक्त आदेश कचेरीतील कर्मचाऱ्यांना, तलाठ्यांना दिला आहे.

सध्‍या गृह आधार योजनेसाठी लोकांना निवासी आणि मिळकतीचा दाखला आवश्यक आहे. ‌तो मिळविण्यासाठी मुरगाव मामलेदार कार्यालयात दररोज मोठी गर्दी असते.याचाच गैरफायदा दलालांनी उठवून लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन दाखले मिळवून धंदा सुरू केला आहे.यात मामलेदार कार्यालयातील कर्मचारी, तलाठी प्रत्यक्षपणे दलालांना मदत करीत आहेत.याचीच पोलखोल दै. ‘गोमंतक’ने केल्यावर मामलेदार कार्यालयातून वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून दलाल गायब झाले आहेत.

दरम्यान, मामलेदार कार्यालयातील तलाठी अमरेश नाईक यांनी यावेळी मामलेदार प्रभू यांच्या समक्ष अधिक माहिती देताना काही नगरसेवक आमच्यावर दबाव आणून दाखले मिळवितात, अशी माहिती दिली.

 

 

आठ कोटींच्‍या विकास कामांची यादी सरकारला सादर : नंदादीप राऊत

संबंधित बातम्या