सत्तरी अर्बन सहकारी पतसंस्थेत कथित ४ कोटींचा गैरव्यवहार

sattri Urban Co-operative Credit Societies allegedly 2 crore scam
sattri Urban Co-operative Credit Societies allegedly 2 crore scam

पणजीः सत्तरी अर्बन सहकारी पतसंस्थेत कथित सुमारे ४ कोटींचा गैरव्यवहार झाल्याची लेखी तक्रार आमदार आलेक्स रेजिनाल्ड यांनी सहकार निबंधकांकडे दाखल केली आहे. या निवेदनाच्या प्रती त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व सहकारमंत्री गोविंद गावडे यांना दिल्या आहेत. याप्रकरणी सरकारने लक्ष घालून चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

या पतसंस्थेतील गैरव्यवहारबाबत सहकार निबंधक खात्याकडे सुमारे १५ तक्रारी आजपर्यंत दाखल करून त्यांच्या निदर्शनास आणून दिले तरी एकाही तक्रारीची खात्याने चौकशी केलेली नाही व या गैरव्यवहाराची दखल घेतली नाही. या पतसंस्थेत सुमारे १५० कर्मचारी

प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कामाला असून त्यांचे भवितव्य या बँकेवर आहे. या पतसंस्थेने बचत खात्यावरील ग्राहकांना नेहमीपेक्षा कमी व्याज दिले आहे. त्यामुळे बँक खातेदारांना या गैरव्यवहारामुळे फटका बसला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या पतसंस्थेचे दोन संचालकांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन या कथित गैरव्यवहाराचा तपास करू नये यासाठी मनधरणी धरली आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास सध्या ठप्प आहे. या गैरव्यवहारामध्ये पतसंस्थेचा व्यवस्तापकीय संचालक गुंतलेला आहे, असे आलेक्स रेजिनाल्ड यांनी या लेखी तक्रारीत म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com