२६ जानेवारीला मगोतर्फे म्हादई बचाव आंदोलन

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:खांडेपार - ओपा येथे मगोतर्फे २६ जानेवारीला म्हादई बचाव आंदोलन   

पणजी:खांडेपार - ओपा येथे मगोतर्फे २६ जानेवारीला म्हादई बचाव आंदोलन   

सत्तरी तालुक्यातील उस्ते येथील महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या (मगो) म्हादई बचाव आंदोलनाला चांगला प्रतिसाद मिळाला.हे आंदोलन येत्या २६ जानेवारीला सकाळी १०.३० वा. फोंडा तालुक्यातील खांडेपार - ओपा येथील भागात आयोजित करण्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री व मगोचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी दिली.
म्हादई बचाव आंदोलनाची सुरवात उस्ते येथून करण्यात आली.या ठिकाणी जाण्यासाठी रस्ता नसून पायवाट आहे व त्यावरून लोकांनी तसेच ज्येष्ठ नागरिकांनी म्हादईच्या बचावासाठी पायपीट केली. २६ जानेवारी हा देशाचा प्रजासत्तकदिन आहे.भारतीय घटनेत धरती मातेचे संरक्षण व पारपंरिक झरे व नद्यांचा बचाव असा उल्लेख आहे. खांडेपार - ओपा येथे पारंपरिक सुमारे एक हजार वर्षापूर्वीचे देऊळ आहे व तेथेच म्हादई व मांडवी नदीचा संगम होतो.त्याच ठिकाणी हे आंदोलन केले जाणार आहे.म्हादईच्या बचावासाठी गोमंतकीयांनी एकत्रित येण्याचे आवाहन राज्यपालांनी केले आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो, असे आमदार ढवळीकर म्हणाले.

 

 

"टॅक्सी भाडे लवकरच डिजीटल मीटरनुसार"

संबंधित बातम्या