माध्यमिक शालेय स्तरावरून शिक्षण सोडण्याचे प्रमाण घटले

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 6 फेब्रुवारी 2020

मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत माहिती

सध्याच्या चालू शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मध्ये इयत्ता नववी ते बारावीच्या ७ हजार २०० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना एनएसक्यूएफ योजनेचा फायदा होणार असल्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ही माहिती दिली आहे. एनएसक्यूएफ विद्यार्थ्यांना सात विषयांची निवड करण्यास अनुमती देते.

पणजी : राष्ट्रीय कौशल्य पात्रता रचना (एनएसक्यूएफ) आणि पूर्व-व्यावसायिक शिक्षणाच्या माध्यमातून २०१७-१८ च्या माध्यमिक शालेय स्तरावरून शिक्षण सोडण्याचे प्रमाण जवळपास ७.३ टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. तर त्यापूर्वी हे प्रमाण १६ टक्के होते, असे सध्या विधानसभा अधिवेशनात मांडलेल्या उत्तरानुसार पुढे आले आहे.

ज्यामध्ये पर्यटन आणि इतर १४ कौशल्यविषयक प्रशिक्षणांचा समावेश आहे. सहा नियमित विषयांसह आणि सातव्या विषयात एनएसक्यूएफने ठरविलेल्या एका विषयाची निवड विद्यार्थ्यांना करावी लागते. या सात पैकी सहा विषयांत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे.

ज्या विद्यार्थ्यांनी या योजनेंतर्गत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली तर तो उच्च माध्यमिक स्तरावर तसेच त्यांच्या आवडीच्या विषयाचे प्रशिक्षण चालू ठेवू शकणार आहे. त्याचबरोबर पुढे हा विद्यार्थी व्यावसायिक प्रवाहात पदवीपर्यंतचे शिक्षण घेऊ शकणार आहेत. शालेयस्तरावर एनएसक्यूएफ अंतर्गत विद्यार्थ्यांना उद्योग व्यावसायिकांच्या व्याख्यानांना हजेरी लावावी लागणार आहे, ही त्यात अट असेल. त्याचबरोबर वर्षामध्ये किमान चार औद्योगिक कारखान्यांना भेटी देऊन अहवाल तयार करावा लागेल. या प्रशिक्षणाविषयी उद्योग तज्ञांकडून विद्यार्थ्यांचे मूल्यांकन केले जाणार असल्याचे म्हटले आहे.

राष्ट्रीय कौशल्य विकास महामंडळाच्या माध्यमातून उद्योगातील व्यक्तींकडून राष्ट्रीय संस्था आणि राज्य सरकारामध्‍ये झालेल्या सामंजस्य कराराच्या आधारे २०१७ पासून मूल्यांकन केले जात आहे. त्याशिवाय ग्रामीण भागातील अनुदानित संस्थांमध्ये २०१० च्या आसपास पूर्व-व्यावसायिक योजना सुरू केली गेली. या योजनेंतर्गत विद्यार्थी इयत्ता आठवीपासून गणित, विज्ञान किंवा सामाजिक शास्त्रामधील कोणताही विषय सोडू शकतात.

 

 

 

नाव व आडनाव बदलाच्या नोंदणीला आव्हान

संबंधित बातम्या