स्‍वयंअपघातात दुचाकी अपघातात दोन युवक ठार  

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 20 जानेवारी 2020

कुर्टी, म्‍हापसा:स्‍वयंअपघातात दोन युवक ठार

कुर्टी, म्‍हापसा:स्‍वयंअपघातात दोन युवक ठार
करमळे, केरी येथील एका ३१ वर्षीय युवक आज पहाटे २.३० वा.च्‍या सुमारास स्वयंअपघातात ठार झाला. रस्त्याच्या बाजूला असलेल्या संरक्षक भिंतीला त्याची दुचाकी धडकल्याने तो जागीच ठार झाला.दुर्दैवी युवकाचे नाव नितेश केरकर असे असून तो ३१ वर्षांचा होता.नितेश केरकर हा करमळे येथील रहिवासी असून फोंडा येथे झालेला कार्यक्रम आटोपून घरी येत होता. सरकारी प्राथमिक शाळेजवळ पोहोचल्यावर त्याचे दुचाकीवरील नियंत्रण गेले आणि दुचाकी रस्त्याच्या संरक्षक भिंतीला दुचाकीने धडक दिली.यामुळे चालक नितेश याच्‍या डोक्‍याला जबर मार बसल्यामुळे तो गंभीर जखमी झाला. तशाच स्थितीत तो सुमारे तासभर पडून राहिला.पहाटे ३.३०वा.च्या सुमारास स्थानिक लोकांच्या दृष्टीस पडल्याने त्याला हॉस्पिटलमध्ये तातडीने नेण्यात आले. पण, तिथे पोहोचेपर्यंत त्याला मृत्यू आला होता.अपघाताविषयी फोंडा पोलिस स्थानकात प्रकरण नोंद झाले असून पुढील चौकशी उपनिरीक्षक आदित्य वेळीप हे करीत आहेत.
घाटेश्‍‍वरनगर म्‍हापसा येथील उतरणीवर रविवारी सायंकाळी झालेल्‍या अपघातात एकतानगर गृहनिर्माण वसाहत, म्‍हापसा येथे राहणाऱ्या सनद उमेश मोरजकर (२०) या युवकाचा मृत्‍यू झाला. सनद हा आसगाव येथील डीएमसी कॉलेजकडून दुचाकीवरून उतरणीवरून जात असता त्‍याचा तोल जाऊन त्‍याने रस्‍त्‍याच्‍या बाजूच्‍या कुंपणाला धडक दिली व त्‍यात तो गंभीर जखमी झाला.याला आझिलो इस्‍पितळात, त्‍यानंतर गोमेकॉत दाखल करण्‍यात आले. तेथील डॉक्‍टरांनी त्‍याला तपासल्‍यावर मृत घोषित केले.या अपघाताचा पंचनामा उपनिरीक्षक आशिष परब यांनी केला.

 

 

पणजीत लवकरच ‘पे-पार्किंग

संबंधित बातम्या