मंत्र्यांला खंडणीसाठी धमकी देणाऱ्याचा शोध सुरू  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

पणजी:मंत्र्यांकडे खंडणी मागणाऱ्यामुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

पणजी:मंत्र्यांकडे खंडणी मागणाऱ्यामुख्य सूत्रधाराचा शोध सुरू

राज्याचे बांधकाममंत्री दीपक पाऊस्कर यांना फोन करून ३ कोटींची खंडणीची मागणी करणाऱ्याच्या तिघा साथीदारांना पणजी पोलिसांनी अटक केली असली तरी मंत्र्यांना बदनाम करण्याची धमकी देणाऱ्या मुख्य सूत्रधाराचा शोध सुरू झाला आहे.हे धमकीचे व त्यापोटी खंडणीची मागणी करणारे फोन दुबई व मुंबईतून आले होते.या फोनची माहिती घेऊन मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न करत आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यांची नावे ऋषिकेश पाटील (२७),प्रवीण नाईक(२८) व अमोल सामी (२८) अशी असल्याचे उघड झाले.ते सर्वजण मुंबईतील रहिवासी आहेत.न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.या तिघांना मुंबईतील एका युवकाने पाठवले होते.मात्र,ते त्याला ओळखत नाहीत. ३ कोटींच्या रक्कमेतील काही टक्के रक्कम त्यांना मिळेल असे आमिष दाखविल्याने ते मंत्र्यांकडे रक्कम नेण्यास आले होते.मुंबई व दुबईतून मंत्र्यांना फोन करणाऱ्या व्यक्तीबाबत त्यांना काहीच माहिती नाही.या संशयितांची अधिक चौकशी करून मुख्य सूत्रधारापर्यंत पोहचण्यासाठी पोलिसांनी त्यांची पोलिस कोठडी मागितली होती, मात्र ती फेटाळण्यात आली.या संशयितांची माहिती मुंबई पोलिसांशी गाठून पणजी पोलिस घेत आहे. त्यांची पार्श्‍वभूमीही तपासण्यात येत आहे.
मंत्री दिपक पावस्कर यांनी खंडणीबहाद्दरला ३ कोटी देण्याचे मान्य करून आल्तिनो - पणजी येथील आपल्या शासकीय बंगल्यावर येण्यास सांगितले.त्या बंगल्याचा पत्ताही दिला.हे धमकीचे फोन गेला आठवडाभर अधुनमधून येते होते.सुरुवातीला या फोनकडे मंत्र्यांनी दुर्लक्ष केले मात्र पुन्हा हे फोन येऊ लागल्याने मंत्री यांनी त्याची माहिती पोलिसांना दिली.फोन करून खंडणीची मागणी करणाऱ्याला पैसे देण्याचे मान्य करून त्याला ते नेण्यास यायला सांगण्याची सूचना पोलिसांनी मंत्र्यांना केली.त्यानुसार गेल्या सोमवारी तिघे तरुण मंत्र्यांच्या बंगल्यावर संध्याकाळच्या सुमारास आले.त्यावेळी तेथे साध्या वेशातील पोलिसांनी या तिघांच्या मुसक्या आवळल्या.ही घटना सोमवारी (२० जानेवारी) संध्याकाळच्या सुमारास घडली होती.

 

विशेष फेरींसाठी सुधारित दरांचे आदेश निघूनही अंमलबजावणी नाही.

संबंधित बातम्या