टपाल मुख्यालयात ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था

Dainik Gomantak
बुधवार, 1 जानेवारी 2020

पणजी,  
पणजी येथील टपाल मुख्यालयात होणारी गर्दी पाहता आजपासून रांग व्यवस्थापन प्रणाली लागू करण्यात आली. काऊंटरवरील ग्राहकांची प्रतीक्षा संपवण्यासाठी अशाप्रकारची सुविधा फेब्रुवारी २०१९ पासून सुरु होती. यात आता भर घालून ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी रांग करण्यात आली आहे. 
मुख्य पोस्टमास्तर जनरल डॉ एन विनोदकुमार यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ज्येष्ठ नागरिक सेलिना फर्नांडिस यांना तीन मिनिटांपेक्षाही कमी काळात सेवा प्रदान करण्यात आली, त्यावर त्यांनी समाधान व्यक्त केले.

स्‍मार्ट फोनच्‍या जमान्‍यात अनेकजण पैसे टाकण्‍यासाठी ॲप्‍सचा वापर करीत असले तरी यामध्‍ये तरूणांचा आकडा मोठा आहे. काही ज्‍येष्ठ मंडळी अद्यापही मनीऑरर्ड, पत्रे यासारख्‍या पोस्‍ट खात्‍याकडून देण्‍यात येणार्‍या सेवेवर अवलंबून असल्‍याचे पहायला मिळते. त्‍यांना येथे ताटकळत उभे रहावे लागू नये म्‍हणून हि सोय करण्‍यात आली आहे. 
 
संबंधित बातम्या