वास्कोत नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनात पत्रके

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 28 जानेवारी 2020

दाबोळी:पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली केंद्र सरकार योग्य दिशेने पाऊल टाकत आहे.त्यांच्या दूरदृष्टी नजरेतूनच नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू करण्यात आला.या कायद्याला समर्थन देणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन, वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी केले.

दाबोळी:पंतप्रधान नरेद्र मोदी यांच्या मार्गदर्शनखाली केंद्र सरकार योग्य दिशेने पाऊल टाकत आहे.त्यांच्या दूरदृष्टी नजरेतूनच नागरिकत्व सुधारणा कायदा देशात लागू करण्यात आला.या कायद्याला समर्थन देणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असल्याचे प्रतिपादन, वास्कोचे आमदार कार्लूस आल्मेदा यांनी केले.
‘नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या’ समर्थनासाठी वास्को शहरात आमदार कार्लूस आल्मेदा यांनी वास्को भाजप मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यासह पत्रके वाटली.यावेळी त्यांच्यासमवेत वास्को भाजप गटाध्यक्ष दीपक नाईक, नगरसेवक यतीन कामूर्लेकर, राज्य भाजप कार्यकारिणी सदस्य जयंत जाधव, संतोष लोटलीकर, माजी गटाध्यक्ष राजेंद्र डिचोलकर, सचिव संदीप नार्वेकर, युवा मोर्चा अध्यक्ष गिरीश नाईक, एकनाथ शिरोडकर, हर्षला शेट्ये, हर्षद पवार, सुचिता ठक्कर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना आमदार आल्मेदा म्हणाले की, देशाच्या एकात्मतेसाठी पंतप्रधान मोदी केंद्र सरकारची धुरा योग्यरीत्या सांभाळत असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली देश विकासाच्या मार्गाने जात आहे.नागरिकत्व सुधारणा कायद्याचे समर्थन करणे प्रत्येक भारतीयांचे कर्तव्य असून याचे पालन सर्वसामान्य जनतेने करणे गरजेचे आहे.
यावेळी वास्को भाजपा गटाध्यक्ष दीपक नाईक म्हणाले, की देशाची अखंडता मजबूत करण्यासाठी केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायदा अंमलात आणला असून याचे पालन करणे सर्वधार्मियांचे प्रथम कर्तव्य आहे. देशहितासाठी या कायद्याचे समर्थन करण्यासाठी सर्वांनी केंद्र सरकारला पाठिंबा देण्यासाठी पुढाकार घ्यावा. याप्रसंगी जयंत जाधव, राजेंद्र डिचोलकर यांची ही भाषणे झाली. आमदार कार्लूस आल्मेदा व इतर भाजप कार्यकर्त्यांनी वास्को शहरात फिरून कायद्याच्या समर्थनात पत्रके वाटली. दरम्यान, मुरगाव तालुक्‍यातील चारही मतदारसंघातून नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनासाठी वास्को शहरात रविवार २ फेब्रुवारी रोजी भव्य पदयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

 

 

 

संबंधित बातम्या