वास्कोत शिवजयंती साजरी

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

वास्कोत अखिल भारतीय मराठा जागृती मंचतर्फे आयोजित शिवजयंती कार्यक्रमाचे सम उद्‌घाटन करताना शेखर खडपकर.सोबत इतर मान्यवर.

छत्रपती शिवरायांचे विचार आत्मसात करा
प्रा. घोडके : वास्कोत मराठा जागृती मंचतर्फे शिवजयंती उत्सव

 

मुरगाव : प्रत्येकाने शिवरायांचे विचार आत्मसात करून करायला हवे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणून व्यसनमुक्त आणि संस्कारयुक्त पिढीसाठी शिवचरित्र आवश्यक आहे, असे मत शिवचरित्राचे अभ्यासक प्रा.अरुण घोडके यांनी अखिल भारतीय मराठा जागृती मंच गोवा शाखेने आयोजित केलेल्या शिवजयंती उत्सवात केले.

अखिल भारतीय मराठा जागृती मंच आयोजित या शिवजयंती उत्सवाला महाराष्ट्रातील शिवनेरी गडावरून दीडशे मावळे भगवा वेष परिधान करून दुचाकीवरून शिवज्योत घेऊन वास्कोत दाखल झाले होते. त्यांचे स्वागत सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर व नगरसेवक दाजी साळकर यांनी केले. रवींद्र भवन बायणा येथे दाखल होताच उपस्थित शिवप्रेमीनीही त्यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले. शिवप्रेमीनी 'जय भवानी जय शिवाजी' अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. व्यासपीठावरील भव्य शिव प्रतिमेचे पूजन करून व मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून या कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. प्रारंभी पाळणा गीत सादर केले.

व्यासपीठावर सांगली येथील शिवचरित्राचे गाढे अभ्यासक व व्याख्याने प्रा. अरुण घोडके प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. सांकवाळचे माजी सरपंच रमाकांत बोरकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष शशिकांत परब, उपाध्यक्ष डॉ. धमेंद्र प्रभुदेसाई, नगरसेवक दाजी साळकर, मुरगाव हिंदू समाजाचे उपाध्यक्ष शेखर खडपकर, श्री दामोदर भजनी सप्ताह उत्सव समितीचे अध्यक्ष जगदीश दुर्भाटकर, अखिल भारतीय मराठा जागृती मंच गोवाप्रदेश अध्यक्ष राजाराम पाटील, मुरगाव शाखेचे अध्यक्ष नागराज वाबळे, शिवज्योत प्रमुख बळवंत पाटील, सल्लागार जयवंत पाटील व अन्य मान्यवर उपस्थित होते.
गेली बत्तीस वर्षे शिवचरित्राचा अभ्यास करणारे प्रा. घोडके यांनी या उत्सवात सव्वा तास व्याख्यान दिले. आजपर्यंत त्यांनी देशात व विदेशात जवळपास साडेचार हजार व्याख्याने दिलेली आहे.

या शिवजयंती उत्सवात त्यांनी आपल्या व्याख्यानात शिवाजी महाराजांचे चरित्र, जिजाऊंचे कर्तृत्व मावळ्यांचा प्रताप आणि शिवकालीन इतिहासातील विशिष्ट कथांचे वर्णन केले. या इतिहासातून आजच्या समाजाने योग्य धडा घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. हिरोजी इंदोरकर यांनी केलेली किल्यांची बांधणी, शिवाजी महाराजांनी त्यांना देऊ केलेली बक्षिसे व त्यानंतरचा प्रसंग, शिवाजी जाणलेले तलवारी बरोबरच लोखणीचे महत्व, दीड हजार मौलांची आग्राभेट, वेढात दौडलेले सातवीर मराठे, लढाऊ आणि तेवढ्याच प्रेमळ असलेल्या जिजामाता यांचा आपल्या निष्ठावंत सैनिकांप्रती असलेला आदर शिवाजी महाराजांचा शब्द जपण्यासाठी प्राण त्यागणाची तयारी दाखवणारे मावळे, शिवरायांची शिस्त आणि कर्तव्य कठोरता अशा इतिहासातील विविध घटना व गूण वैशिष्ठ्यावर प्रकाश टाकला.

रमाकांत बोरकर म्हणाले, ‘शिवयोग’ आता परत अवतरू लागल्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजी व संभाजी महाराजामुळे गोव्यात आज हिंदू संस्कृती टिकून आहे

संबंधित बातम्या