लावणीची श्री पध्‍दत पडतेय मागे...

dainik gomantak
रविवार, 3 मे 2020

गोव्‍यातील शेतकरी यांत्रिक पध्‍दतीने अवलंबित लागवड करण्‍यासाठी अधिक प्ररत्‍नशील असतात. कारण यासाठी सरकारकडू निधी दिला जातो आणि त्‍यामुळे शेतकऱ्‍याला आर्थिक पातळीवर मदत होते. 

पणजी,

 गोव्‍यात २०१० साली सुरू करण्‍यात आलेली भात लावणीची श्री पध्‍दत आता मागे पडत असल्‍याचे चित्र दिसून येत आहे. भाताच्‍या पिकाचे उत्‍पन्‍न अधिक येण्‍याच्‍या दृष्‍टीने नाबार्ड आणि मिनरल फाउंडेशन या विनाशासकीय संस्‍थेने या पध्‍दतीची ओळख करून दिली होती. 
नाबार्डने या प्रकल्पासाठी अर्थसहाय्य पुरवले होते, ज्यासाठी तांत्रिक आधार देण्यासाठी मिनरल फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेने पुढाकार घेतला. पारंपरिक पद्धतीने भात पिक लागवड केलेल्‍या पध्‍दतीपेक्षा या पध्‍दतीने केल्‍यास दुप्पट उत्पन्‍न येण्‍याची आशा असल्‍याचे अनेक शेतकरी या पध्‍दतीकडे वळले होते. तथापि, गेल्या काही वर्षांत यांत्रिकीकरणाच्‍या भात लागवडीची प्रक्रिया हाती घेतल्यामुळे श्री ही पध्‍दती मागे पडत आहे. 
कृषी खात्‍याकडून मिळालेल्‍या माहितीनुसार, सांगे, केपे, काणकोण, सत्तरी या भागातील काही लोक अद्यापही या भात शेतीचा अवलंब करतात. या शेतीमध्‍ये ठराविक अंतर ठेवून हाताने लावणी करावी लागते. या कामासाठी स्‍वतंत्र कामगार लागतात. काही ठिकाणी एकमेकांच्‍या शेतीत कामाला जाण्‍याची प्रथा आहे. त्‍यांच्‍यासाठी ही पध्‍दत लाभदायी आहे. मात्र, जे लोक कामगार घेऊन काम करतात, त्‍यांच्‍यासाठी ही पध्‍दत काही महागडी ठरत आहे. तसेच जी शेती डोंगराळ भागात होते, तेथे अनेक शेतकरी या शेती पध्‍दतीचा अवलंब करीत असल्‍याची माहिती कृषी खात्‍याने दिली. 
गोव्‍यातील शेतकरी यांत्रिक पध्‍दतीने अवलंबित लागवड करण्‍यासाठी अधिक प्ररत्‍नशील असतात. कारण यासाठी सरकारकडू निधी दिला जातो आणि त्‍यामुळे शेतकऱ्‍याला आर्थिक पातळीवर मदत होते. 
दरम्‍यान, काही शेतकऱ्‍यांनी अशीही माहिती दिली की, या लागवड पध्‍दतीमुळे बियाणे वाचतात, त्‍यांचे नुकसान होत नाही आणि जागेचा सुयोग्‍य वापर करता येतो.
 

संबंधित बातम्या