अफवांवर विश्वास न ठेवता अध्ययन करावे.

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 25 फेब्रुवारी 2020

विद्यार्थ्यांनी हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ नये.

उपराष्ट्रपती नायडू यांचे आवाहन: सीसीएवर मत मांडण्यापूर्वी अभ्यास करावा

कला अकादमीच्या दिनानाथ मंगेशकर सभागृहात पार पडलेल्या गोवा विद्यापीठाच्या ३२ व्या वार्षिक दीक्षांत समारंभाचा कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलपती तथा राज्यपाल सत्यपाल मलिक आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत, कुलगुरू वरून साहनी, कुलसचिव वाय.व्ही. रेड्डी यांची उपस्थिती होती.

पणजी : युवकांनी शिक्षण घेताना शिक्षणावरच लक्ष केंद्रीत केले पाहिजे. त्यांनी नकारात्मकता रोखण्याबरोबरोच आणि मनामध्ये कोणत्याही हिंसाचाराला प्रोत्साहन देऊ नये, मत मांडण्यापूर्वी नागरिक सुधारणा कायद्यासारख्या (सीएए) विषयांवर शैक्षणिक अभ्यास करायला हवा, असे मत उपराष्ट्रपती एम. व्यंकय्या नायडू यांनी  (सोमवारी) व्यक्त केले.

विद्यार्थ्यांना पदवीप्रदान केल्यानंतर नायडू म्हणाले, मलाही आनंद झाला आहे की अलिकडच्या काळात लोक राज्यघटनेचे महत्त्व सांगत आहेत. खरोखर ही एक चांगली चिन्हे आहेत आणि प्रत्येक नागरिकाने घटनेतील पत्र व भावनेचे पालन केले पाहिजे. प्रत्येकाने आपले ध्येय साध्य करण्यासाठी घटनात्मक पद्धती जोपासल्या पाहिजेत. केवळ मूलभूत अधिकारांबद्दलच नव्हे तर कर्तव्याबद्दलही आपण काळजी घेतली पाहिजे. अधिकार आणि जबाबदाऱ्या एकत्र करायला हव्यात.

उपराष्ट्रपती पुढे म्हणाले की, देशातील ५५ टक्के युवक हा ३० वयोगटाखाली आहे. अशा युवा शक्तीचा तथा त्यांच्या उर्जेचे रचनात्मक आणि राष्ट्रनिर्मिती करण्याच्या कार्यक्षमतेत रुपांतर करणे ही काळाची गरज आहे. नकारात्मकता टाळणे आणि तिला प्रोत्साहित न करणे महत्त्वाचे आहे. लोकशाहीमध्ये हिंसाचाराला अजिबात स्थान नाही.

सुरुवातीला उपराष्ट्रपतींनी कोकणीतून उपस्थितांना शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर त्यांनी महिलांची शिक्षणातील प्रगती पाहता कुटुंबांसाठी ती महत्त्वाची बाब आहे. गोवा विद्यापीठाचे देशांतर्गत शंभरच्या आत मानांकन आहे ते मानांकन सुधारले पाहिजे, यासाठी विद्यापीठ कार्यकारी मंडळाने प्रयत्न केले पाहिजेत. निसर्गता, संस्कृती हेच आपले भविष्य आहे. समाजमाध्यमांच्या दोन बाजू आहेत, त्यातील एक चांगली आणि एक वाईट बाजू आहे, हेही युवकांनी लक्षात घेतले पाहिजे. त्याचबरोबर त्यांनी प्राथमिक शिक्षण मातृभाषेतूनच झाले पाहिजे, असेही स्पष्ट केले.

कुलपती तथा राज्यपाल मलिक म्हणाले की, उच्च शिक्षण आपल्याला कुटुंब, समाज तथा जगामध्ये योगदान देण्यासाठी सक्षम बनविते. उच्च शिक्षणाच्या कक्षा रुंदावलेल्या आहेत, केवळ पदवी घेणे एवढेच उच्च शिक्षणाची गरज राहिलेली नाही. तर ज्वलंत समस्या सोडविण्यासाठीही ते शिक्षण काम करीत आहे. प्राध्यापकांची संशोधनात्मक भेट हा गोवा विद्यापीठाचा कार्यक्रम वेगळी ओळख निर्माण करू शकला आहे. लहान विद्यापीठांमध्ये हे विद्यापीठ पहिल्या तीनमध्ये येत आहे

संबंधित बातम्या