पट्टेरी वाघानंतर सत्तरीत अस्वलांचा लोकवस्तीत संचार

Dainik Gomantak
मंगळवार, 28 जानेवारी 2020
वाळपई :
वाळपई :
सत्तरी तालुक्यात पट्टेरी वाघांचा संचार समोर आलेला असताना आता अस्वलांचा संचार दिसून येतो आहे. नगरगाव पंचायत क्षेत्रातील काही गावात लोकांनी तीन अस्वलांना फिरताना बघितले आहे. आंबेडे गावचा, धावें गावच्या परिसरात ही अस्वले लोकांना सकाळी, दुपारच्या वेळेत दिसली आहेत. त्यामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गेल्या पंधरा वीस दिवसात ही अस्वले नजरेस पडली आहेत. लोक कामानिमित्य परिसरातील काजू बागायतीत जातात. त्यावेळी ही अस्वले दिसली आहेत. एकवेळ पट्टेरी वाघ देखील लोकांना बघून पळून जातो. पण अस्वले प्राणी मात्र हल्ला करतात. दुचाकी वाहन घेऊन जाताना लोकांना धोका संभवत आहे.

संबंधित बातम्या