विज्ञानाबाबत जनजागृती महत्त्‍वाची असल्‍याचे मत डॉ. प्रकाश चौहान यांनी व्‍यक्‍त केले.

Dainik Gomantak
गुरुवार, 16 जानेवारी 2020

पणजी, 
विज्ञानाबाबत जनजागृती आणि चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारमार्फत योग्य पाऊले उचलली जात आहेत. बरेच लोक गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांपासून भीतीपोटी दूर पळत असतानाही, त्यांना विज्ञानाच्याजवळ आणण्याची तसेच त्यांना वेगळ्या पद्धतीने या विषयांबाबत माहिती करून देण्याची आपली जबाबदारी असल्‍याचे मत आयआरआरएस- इसरो सेंटर, देहरादूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान यांनी व्‍यक्‍त केले. 

पणजी, 
विज्ञानाबाबत जनजागृती आणि चित्रपट निर्मितीला प्रोत्साहन देण्यासाठी गोवा सरकारमार्फत योग्य पाऊले उचलली जात आहेत. बरेच लोक गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांपासून भीतीपोटी दूर पळत असतानाही, त्यांना विज्ञानाच्याजवळ आणण्याची तसेच त्यांना वेगळ्या पद्धतीने या विषयांबाबत माहिती करून देण्याची आपली जबाबदारी असल्‍याचे मत आयआरआरएस- इसरो सेंटर, देहरादूनचे संचालक डॉ. प्रकाश चौहान यांनी व्‍यक्‍त केले. 
मुख्‍यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍या उपस्‍थितीत भारतीय विज्ञान फिल्म महोत्सवाच्‍या (साय फी) ५ व्‍या आवृत्तीची झाली. यावेळी ते बोलत होते. साय फी या महोत्‍सवाचे उद्‍दीष्‍ट हेच आहे की विविध विज्ञानावर आधारीत प्रदर्शने, कार्यशाळा, मास्‍टर क्‍लास आणि विविध उपक्रमांच्‍या माध्‍यमातून विज्ञानाची ओळख युवा मनाला करून देण्‍यासाठी प्रयत्‍न सुरू आहेत. 
विज्ञान हा केवळ एक महत्त्वाचा विषय नाही तर एक मनोरंजक क्षेत्रसुध्‍दा आहे. ज्‍याला भरपूर वाव आहे. संशोधन, विकास
आणि शोध यासारख्‍या बाबी ऑडिओ व्हिज्युअल माध्यमातून आणि विविध उपक्रमांतून अत्‍यंत चांगल्‍या पध्‍दतीने उलगडत जातात. आम्ही आशा करतो की आमचे गोमंतकीय विद्यार्थी आणि शिक्षक अशा महोत्‍सवाचा उत्कृष्ट वापर करतील आणि त्‍यांच्‍या ज्ञानात यामुळे भर पडेल, विज्ञान परिषद, गोवाचे अध्‍यक्ष सुहास गोडसे म्‍हणाले. 
विज्ञानाच्‍या प्रचारासाठी विज्ञानावर आधारीत चित्रपट प्रभावी आहेत. हे चित्रपट मोठ्या प्रमाणात लोकांना विज्ञानाबाबत माहिती देतात. अशा महोत्‍सवांमुळे प्रेक्षकांमध्ये वैज्ञानिक मनोवृत्ती निर्माण होण्यास मदत होते आणि त्यामुळे देशाच्या समावेशक विकासाची पूर्वस्थिती असलेल्या विश्लेषक विचारांना आकार मिळण्‍यास मदत होत असल्‍याचे सत्यजित रे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट (एसआरएफटीआय) च्‍या संचालक डॉ. देबमित्रा मित्रा यांनी सांगितले. 
गोव्यातील विज्ञान शिक्षणाबाबतची आव्हाने आणि भविष्यातील संभावना या विषयावरील शिक्षकांसाठीच्‍या कार्यशाळेचे उद्घाटन गोवा शिक्षण संचालनालयाच्या संचालक, आयएएस. वंदना राव यांच्या उपस्थितीत झाले. त्यानंतर भाभा अणु संशोधन केंद्र (बीएआरसी) चे प्रख्यात व्यक्तिमत्व पद्मश्री डॉ शरद काळे यांनी विज्ञान शिक्षण - त्याची भूमिका व जबाबदाऱ्या या विषयावर भाषण केले.
त्यानंतर गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (जीबीएसएचएसई) चे सचिव भागीरथ शेट्टी, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) चे संचालकनागराज होन्नेकेरी, विज्ञान भारती (विभा)चे आयोजन सचिव  जयंतराव सहस्त्रबुद्धे,  (सारस्वत विद्यालय) पुरुषोत्तम वालावलकर उच्च माध्यमिक कला, विज्ञान व वाणिज्यच्या प्राचार्य  सुप्रिया नेत्रावलकर आणि  श्रीमती.
पार्वतीबाई चौगुले कला व विज्ञान महाविद्यालयाचे सहयोगी प्राध्यापक डॉ. जी. के. नाईक यांची उपस्थिती असणारे परिसंवादाचे सत्र पार पडले. 

स्क्रीनिंगसाठी निवडलेल्या चित्रपटांमध्ये मिशन मंगल, अंतरिक्षम ९००० केएमपीएच, एव्हरेस्ट (२०१५), व्हायरस;(२०१९), टर्मिनेटर: डार्क फॅट (२०१९), जिओस्टॉर्म  (२०१७), आमोरी (२०१९), आय एम लिजंड आणि एज ऑफ टूमारो यांचा समावेश आहे. सध्या सुरू असलेल्या महोत्सवाचा एक भाग म्हणून, प्रदर्शन १८ जानेवारी २०२०पर्यंत सकाळी १० ते ६ पर्यंत सर्वांना पाहण्यासाठी खुले असतील. हे प्रदर्शन ओल्ड जीएमसी बिल्डिंगमध्ये आहे. आयुष मंत्रालय, भारत सरकार यांच्यामार्फत आयोजित प्रदर्शनात नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ ओशनोग्राफी (सीएसआयआर-एनआयओ); राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र (एनसीपीओआर); भारतीय कृषी संशोधन परिषद (आयसीएआर); भारतीय वैज्ञानिक गॅलरी; न्यू एज टेक्नॉलॉजी, आयआयटी मुंबई;
सेरन्स ऑफ सायन्स फॉर दीरघायु - आयुर्वेद कॉलेज, शिरोडा आणि न्यूक्लिअर पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (एनपीसीएल) यांच्याशी निगडित गोष्टीही प्रदर्शनात असतील.

तीन दिवसीय महोत्सवात तीन मास्टरक्लासचे आयोजन करण्यात आले आहे. पहिला मास्टर क्लास  १६ जानेवारी रोजी दुपारी १२.१५ ते १.३० पर्यंत थिओडॉन टेक्नॉलॉजीज येथील राजदीप पॉल घेतील. १७ जानेवारी रोजी दुपारी १२ ते १.३० वाजेपर्यंत सकट शेकर रे हे मास्टर क्लास घेणार आहेत. आणि दुपारच्या जेवणाच्या नंतर दुपारी २ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत एसआरटीएफआयचे प्रतिनिधित्व करणारे अमरेश चक्रवर्ती यांच्यासह दोघे एटीएलॅब्सच्या इनोव्हेशन्स आणि एंटरप्रेन्योरशिप या विषयावरील
सेशन घेणार आहेत.  ईएसजी येथे ऑडी क्र. २ मध्ये सर्व मास्टर वर्ग घेतले जातील. 

संबंधित बातम्या