या कंपन्यांनी भरला कोटींचा दंड

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

एजीआर'साठी कंपन्यांची धावपळ

एअरटेल, व्होडाफोन, टाटाकडून काही रक्कम जमा

 

नवी दिल्ली : "ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू'पोटी भारती एअरटेल, व्होडाफोन-आयडिया आणि टाटा टेलिसर्व्हिसेस या कंपन्यांनी सोमवारी अनुक्रमे 10 हजार कोटी, 2 हजार 500 कोटी आणि 2 हजार 190 कोटी रुपये भरले आहेत, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली.

भारती एअरटेलला "एजीआर'पोटी 35 हजार 586 कोटी रुपये सरकारला द्यावयाचे आहेत. यातील 10 हजार कोटी रुपये कंपनीने आज भरले आहेत. उरलेली रक्कम ताळेबंदाची तपासणी करून कंपनी भरणार आहे. भारती एअरटेल, भारती हेक्‍साकॉम आणि टेलिनॉर यांचे मिळून 10 हजार कोटी रुपये भरण्यात आले आहेत. सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणीआधी उरलेली रक्कम भरण्यात येईल, असे भारती एअरटेल कंपनीने म्हटले आहे.

व्होडाफोन-आयडिया कंपनीला "एजीआर'पोटी 53 हजार कोटी रुपयांचे देणे सरकारला द्यावयाचे आहे. यातील स्पेक्‍ट्रम शुल्काचे 24 हजार 729 कोटी रुपये आणि परवाना शुल्काचे 28 हजार 309 कोटी रुपये आहेत. आज कंपनीने 2 हजार 500 कोटी रुपये भरले; तसेच, टाटा टेलिसर्व्हिसेस कंपनीने 2 हजार 190 कोटी रुपये भरले आहेत.

टाटा स्टील लिमिटेडचा आर्थिक खर्च

ऍडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यू
दूरसंचार कंपन्या ः 15
एकूण रक्कम ः 1.47 लाख कोटी रुपये
भारती एअरटेल ः 35,586 कोटी रुपये
व्होडाफोन-आयडिया ः 53,000 कोटी रुपये

संबंधित बातम्या