हरमल तिठा येथे गतिरोधक उभारावा

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

हरमल:नागरिकांची मागणी
येथील वाहतुकीची वर्दळ वाढल्याने रस्‍त्‍यांवर वाहतूक कोंडी होत आहे.वाहनांच्या संख्येवर नियंत्रण आणणे कठीण असून किमान आवश्यक ठिकाणी गतिरोधक उभारून विद्यार्थ्यांना सुरक्षा देण्याची मागणी पालक व वाहनचालकांतून होत आहे.दरम्यान, तिठा येथील स्टेट बँकेसमोरील गतिरोधक पेंव्हर्सच्या कामामुळे गायब झाल्याने पादचारी व नागरिकांतून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

तिठा भागातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली होती.नागरिकांच्या मागणीनुसार, मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी पर्यटन महामंडळातर्फे सोळा लाख रुपये खर्चून पेंव्हर्सचे काम केले.मात्र, स्टेट बँकेसमोर गतिरोधक नसल्याने वाहनचालक भरधाव वेगाने वाहने चालवित असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.कित्येक पादचारी गतिरोधक असल्याच्या अविर्भावात रस्ता ओलांडून बँक वा पंचायत कार्यालयात जात असतात.त्यामुळे पादचाऱ्यांचे खूपच हाल होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

भोम पंचक्रोशी हायस्कूल नाका
भोम पालयेतील, पंचक्रोशी हायस्‍कूलचा रस्ता व पालये नाक्यावर दुचाकी अपघातात एका विद्यार्थ्याचा पाय फ्रँक्‍चर झाल्याची घटना घडली.केरीहून भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीने मुख्य रस्त्यावर येणाऱ्या दुचाकिस विरुद्ध बाजूने जोरदार धडक दिल्याने विद्यार्थ्याला पायाचे हाड गमवावे लागले.येथील रस्ता खुला झाल्यापासून केरी- हरमल रस्त्याला गतिरोधकाची मागणी केली जात आहे.त्या नाक्यावर असलेल्या हॉटेलच्या, पालयेचे बाजूने चार -पाच मीटरवर गतिरोधक उभारणे गरजेचे बनले आहे, अशी मागणी नागरिक रामकृष्ण माज्जी यांनी केली आहे.गतिरोधकांबाबत हरमल पंचायतीने ग्रामसभा ठराव मंजूर केला व संबंधित खात्यास पाठविला.याला महिने उलटले,मात्र संबंधीत खाते दुर्लक्ष करीत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
मांद्रे मतदारसंघाचे आमदार दयानंद सोपटे यांनी या प्रश्‍नाकडे जातीने लक्ष घालून पादचारी व विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.

प्रजासत्ताकदिनीचे उपोषण तूर्तास स्‍थगित

संबंधित बातम्या