क्रीडा मेळावा बक्षिस वितरण

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 17 फेब्रुवारी 2020

यंग स्टार्स स्पोर्टस क्‍लबचा क्रीडा मेळावा उत्साहात

वर्षपध्दतीप्रमाणे यंगस्टार्स स्पोर्टस क्‍लबने आपला क्रीडा मेळावा शालेय विद्यार्थ्यांच्या सहकार्याने उत्साहवर्धक वातावरणात नुकताच साजरा केला.

दाबोळी : सासमोळे - बायणा येथील यंग स्टार्स स्पोर्टस क्‍लबचा क्रीडा मेळावा उत्साहात झाला. गेल्या चाळीस वर्षांपासून सुरू केलेली शालेय विद्यार्थ्यांसाठीची ही क्रीडा परंपरा अखंडितपणे चालू ठेवल्याने प्रमुख पाहुणे उद्योजक रियाझ काद्री यांच्याकडून क्‍लबचे कौतुक करण्यात आले.

यात विद्यार्थ्यांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. क्रीडा स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :

मिनी मॅरेथॉन रेस - प्रथम बक्षीस राजकुमार सिंग (माता सेकंडरी स्कूल), दुसरे बक्षीस - प्रदीपकुमार बिंद (अवरलेडी ऑफ कांदेलेरिया हायस्कूल), तिसरे बक्षीस - मकंदर मियान (अवर लेडी ऑफ कांदेलेरिया), १०० मि. धावणे (मुले)- प्रथम - राज जयस्वाल, दुसरे - श्रीकांत राठोड, १०० मि. धावणे (मुली) - प्रथम- रचनाकैवत, दुसरे- कोमल पै, स्लो सायकलिंग - प्रथम- यश पिळणकर, दुसरे -केरमोन खान, म्युझिकल बॉल - प्रथम - बलेश हरिजन, दुसरे - दशरथ बिदं, ब्रेकिंग दी पॉट - प्रथम - रेमी व रिया केरकर यांना बक्षिसे मिळाली.

बक्षीस वितरण समारंभाला व्यासपीठावर प्रमुख पाहुणे उद्योजक रियाझ काद्री उपस्थित होते. त्यांच्या समवेत क्‍लबचे अध्यक्ष राजेश पार्सेकर, अनिल पंडित व विजय केळूस्कर उपस्थित होते. क्‍लबतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी सुमारे चाळीस वंर्षापासून आजतागायत अखंडितपणे क्रीडा स्पर्धा चालू ठेवून शालेय मुलांना प्रेरित केल्याबद्दल श्री. काद्री यांनी क्‍लबचे अभिनंदन करून त्यांचे कौतुक केले. विजेत्यांना त्यांच्या हस्ते बक्षिसे वितरित करण्यात आली.

 

संबंधित बातम्या