श्रीधर मांजरेकर यांचा घरोघरी प्रचार सुरू

Sridhar Manjrekar's house-to-house campaign started
Sridhar Manjrekar's house-to-house campaign started

तेरेखोलः महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे श्रीधर मांजरेकर यांनी मांद्रेचे ग्रामदैवत श्री देवी भगवतीचे दर्शन घेऊन आपल्या घरोघरी प्रचाराचा शुभारंभ शनिवारी केला.

यावेळी त्यांच्यासमवेत उदरगत संस्थेचे अध्यक्ष जीत आरोलकर, मांद्रे पंचायतीचे माजी सरपंच व विद्यमान पंच राघोबा गावडे, सूर्यकांत शेटगावकर, विजय खर्बे, नीलेश मांद्रेकर, श्रीनिवास हडफडकर, श्रीकांत शेट मांद्रेकर, अनंत शेट मांद्रेकर, अच्युत मांद्रेकर, शशिकांत च्यारी, तातो देसाई, जितेंद्र कायसुवकर व अन्य मगो कार्यकर्ते व स्थानिक ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.

यावेळी श्री देवी भगवतीला सामूहिक गाऱ्हाणे घालून व श्रीचरणी श्रीफळ ठेऊन श्रीधर मांजरेकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसोबत मतदारसंघांतील घरोघरी प्रचाराचा प्रारंभ केला. श्रीधर मांजरेकर म्हणाले, मतदारांची प्रत्यक्ष भेट घेण्याची पहिली फेरी यापूर्वीच पूर्ण केली असून अनेक कामांच्या माध्यमातून मतदारांकडे पूर्वीपासून माझा संपर्क सातत्याने आहे. त्यासाठी वेगळा रणनीती आखण्याची आपल्याला कधी गरज भासली नाही. जनतेवर माझा पूर्ण विश्वास आहे. जीत आरोलकर म्हणाले, आमच्या कार्यावर आमचा विश्वास आहे त्यामुळे मोरजी मतदारसंघ हा आमच्याकडेच राहिल. राघोबा गावडे म्हणाले, मांजरेकर यांचा सततचा जनसंपर्क, त्यांचे कार्य, मतदारसंघात जिल्हा पंचायत निधीतून केलेली विकासकामे हीच त्यांच्या विकासाची पावती आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com