‘त्या’ संशयिताचे पणजीत व्यवसाय सुरू

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

पणजी:प्रकाश नाईक आत्महत्त्या प्रकरण
मेरशीचे माजी सरपंच प्रकाश नाईक यांच्या आत्महत्येच्या प्रकरणाशी जोडले गेलेल्या संशयितांपैकी एकाचे पणजी शहरात अनेक व्यवसाय सुरू आहेत.विशेष म्हणजे काही व्यवसायांना पणजी महापालिकेकडून व्यापार परवानाही या संशयिताने घेतले नाहीत.त्या व्यक्तीचे आमदार-मंत्र्यांशी लागेबांधे जोडले असून, महापालिकाही त्याच्याविरुद्ध कारवाई करण्यात धजावत नसल्याची माहिती पुढे आली आहे.

सध्या राज्यभरात मेरशीचे माजी सरपंच नाईक यांनी केलेल्या आत्महत्येचे प्रकरण सर्वत्र गाजत आहे.नाईक यांनी नक्की कोणत्या कारणाने आत्महत्या केली असावी, याविषयी वेगवेगळे तर्क जो-तो मांडत आहे.परंतु नाईक यांच्या आत्महत्येमागे ज्यांची नावे संशयित म्हणून पुढे आली आहेत, त्यातील एका व्यक्तीची पणजीसह आसपासच्या परिसरात चांगलीच दहशत असल्याचे बोलले जाते.
पणजीत ‘त्या’ व्यक्तीचे राज्य सरकारातील अनेकांशी हितसंबंध असल्याने शहरातील व्यवसायाला महापालिकेचा परवाना घेणेही त्यास उचित वाटत नाही.महापालिकेच्या मार्केटमध्येही त्याचे दुकान असून, त्या दुकानाचा विषय अनेकदा पणजी महापालिकेच्या सभेत गाजला आहे.परंतु महापालिकेचे व्यवस्थापन काहीच करू शकत नाही, हे वास्तव आहे.विशेष म्हणजे त्या व्यक्तीविषयी महापालिकेत बरेच काही बोलले जात असून, काही अधिकारी तर माहिती असूनही त्या व्यक्तीच्या विषयावर बोलणे टाळतात.

संबंधित बातम्या