समीर, संजय, रोशन, अबू, गौरीशचे विजय

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 6 मार्च 2020

पणजीः गोवा बॉक्सिंग असोसिएशनच्या राज्यस्तरीय बॉक्सिंग स्पर्धेत चुरस अनुभवायला मिळत आहे. पेडे-म्हापसा येथील क्रीडा संकुलात स्पर्धा सुरू आहे.

स्पर्धेत गुरुवारी झालेल्या लढतीत समीर हुसानीपिरा, संजय कुमार, रोशन समीर, अबू तालिब खान, गौरीश तलवार, साईराज पावसकर, अरुण मसिह, मंजुनाथ पाटील, अशोक पाटील, गोपाळ नाईक यांनी एलिट पुरुष गटात पुढील फेरी गाठताना विजयाची नोंद केली. ज्युनियर मुलांत श्रीनिवास लमाणी, लक्ष्मण लमाणी, रोहन जाधव, जीत रॉय, साहिल वसंत, आकाश लमाणी, तनीश दिवकर यांनी विजय नोंदविली.

मुलींच्या युवा व कॅडेट गटात आरती चव्हाण, अदिती फडते यांनी, मुलींच्या सबज्युनियर व ज्युनियर गटात चांदनी सूरज, श्रावणी गुरव, कविता नाईक, सोनिया चव्हाण, रुधा राठोड, शगुन गुप्ता यांनी विजय मिळविला.

कॅडेट मुलांत सुरेश नाईक, हर्ष शर्मा, अरुण नाईक यांनी, तर सबज्युनियर मुलांत अशोक चव्हणा, आकाश फौंडर, अजय लमाणी, सॅम आफोन्सो, महंमद रेहान, विशाल लमाणी, रितेश रामप्रताब, लक्ष्मण तोरळकर, अल्ताफ मेहबूब, प्रकाश नागप्पा, अविनाश यादव, रमेश घार्ती, देवसिंग बडोरिया यांनी शानदार विजय नोंदविले.

संबंधित बातम्या