हिंदू नेत्यांची हत्या थांबवा !

गोमंतक वृत्तसेवा
बुधवार, 5 फेब्रुवारी 2020

कुठल्याही हत्या ही निषेधार्ह आहे. हिंदुत्वावादी नेत्यांची सातत्याने हत्या करणे यामागे मोठे षड्यंत्र असण्याची शक्यता आहे.

पेडणे: उत्तरप्रदेश येथे विश्‍व हिंदू महासभेचे नेते कमलेश तिवारी यांच्या क्रूर हत्येला ४ महिने अजूनही झालेले नाही तोच आता उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊ येथे विश्‍व हिंदू महासभेचे प्रदेशाध्यक्ष रणजीत बच्चन यांची निर्घृण हत्या करण्यात आली. गतवर्षी भाजपचे नेते तथा हिंदुत्ववादी कबिर तिवारी, भाजपचे नगरसेवक तथा हिंदुत्वादी धारा सिंह यांचीही निर्घृण हत्या करण्यात आली होती.. कायदा आणि सुव्यवस्थेचा हा गंभीर प्रश्‍न असल्याने सरकारने अशा हत्या पुन्हा होऊ नये, यासाठी यामागील गुन्हेगारांना त्वरित अटक करावी. तसेच हत्येच्या सत्रांमागील सूत्रधाराला समाजासमोर आणावे. लोकशाहीत विचारांचा प्रतिवाद हा विचारांनीच करायचा असतो. हत्या केल्याने विचार थांबू शकत नाही. केवळ हिंदुत्ववाद्यांनाच नव्हे, तर सर्व नागरिकांना सुरक्षित वातावरण निर्माण करणे, हे सरकारची जबाबदारी आहे.

वाहतूक खाते सुधारेल का ?

वाहतूक कायार्लय काही ना काही कारणावरून गाजत असते. गेल्या वर्षी तब्बल दोन महिने इटरनेट सेवा बंद पडल्याने पेडण्यातील लोकांना खूपच त्रास सहन करावा लागला. मोदी सरकारने “ डिजिटल  इंडया” चळवळ सुरू केली खरी पण त्याचा काय फायदा ? मी पेडणे वाहतूक कायार्लयात काही कामासाठी गेलो असता, दर दवशी वेगळ वेगळ कारण सांगून “उद्या सकाळी ये” अस सांगून परत पाठवतात. अजर्घेतात पण नंतर काही शुल्लक कारणावरून खेटे घालावे लागतात. मला तर जानेवारी मिहन्यात तब्बल पाच सुट्या काढाव्या लागल्या. सगळ्यात मोठ
आश्‍चर्य म्हणजे, या कायार्लयात काही काम असेल तर सकाळीच जाव लागते कारण तर ते सामान्य लहान मोठ्यामाणसांना हेच सांगतात की “सकाळीच यायचं, दुपारी अर्ज स्वीकारले जाणार नाही”. सरकार यांना अर्धा दिवसासाठीच पगार देत तर नसेल ना? सरकार कार्यालयांमध्ये जुनाट पध्दतीने कामकाज चालते. आपली कामे लवकर व्हावीत, अशी सवर्सामान्यांची अपेक्षा असते. शासकीय कायार्लयामध्ये नेमके तेच होत नाही. लोकांना खेटे घालायला लावणे, त्यांच्या सहनशीलतेचा अंत बघण्यात काही कमर्चाऱ्यांना समाधान लाभते.डिजिटल इंडिया खऱ्या अर्थाने जनतेच्या सेवेसाठी राबविणे आवश्‍यक आहे.
अमित अशोक मोरजे, मोरजी

 

संबंधित बातम्या