आखाडातील पथदीप दिवसा सुरू, रात्री बंद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

माशेलः आखाडा येथील पथदीप भर दिवसा सुरू असतात. रात्रीच्या वेळी ते सुरू केले नसल्याने येथील नागरिकांची गैरसोय होते. येथील घरे उंच सखल भागात असल्याने तसेच इथल्या लोकांचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी असल्याने त्यांना काळोखातूनच ये जा करावी लागत आहे. त्यामुळे या परिसरात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

आखाडा हे बेट असून येथील लोकांचा पारंपरिक व्यवसाय मासेमारी आहे. शिवाय येथील घरे उंच सखल भागात वसलेली आहे. इथल्या वीज खांबावर एलईडी पथदीप बसवले आहेत ते टाईमरने पेटतात. परंतु गेल्या काही दिवसांपासून येथील पथदीप दिवसा सुरू व रात्री बंद असतात. त्यामुळे येथील लोकांना काळोखातच ये जा करावी लागते. त्यामुळे लोकांना तसेच मच्छीमारांना काळोखातूनच वाट शोधावी लागत आहे.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

यासंबंधी स्थानिक पंचसदस्य सुरेंद्र वळवईकर यांना विचारले असता, या पथदीपांच्या समस्येसंबंधी मी वीज खात्याच्या कनिष्ठ अभियंते व वरिष्ठ अभियंते यांना लेखी पत्रव्यवहार करून यासंबंधी कळविले आहे. तरी कुणीच दखल घेत नाही, त्यामुळे तीव्र नाराजी व्यक्त केली.

याठिकाणी पथदीप दिवसा पेटून नाहक विजेची होणारी नासाडी व रात्री पथदीप बंद राहून लोकांची होणारी गैरसोय दूर होणे गरजेचे आहे.
 
संबंधित बातम्या