आमदारांच्या प्रतिमेस काळे फासल्याने निषेध

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

हल्याळ:माजी आमदार सुनील हेगडे हल्ल्याळ भाजपातर्फे तीव्र नाराजी
कारवार येथे सागर माला योजना आंदोलनासंदर्भात लोकसभा सदस्य अनंतकुमार हेगडे आणि कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांच्या प्रतिमेस काळे फासून व त्यांची निंदा केल्याबद्दल माजी आमदार सुनील हेगडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या घटनेचा हल्याळ तालुका भाजपतर्फे त्यांनी निषेध केला आहे.

हल्याळ:माजी आमदार सुनील हेगडे हल्ल्याळ भाजपातर्फे तीव्र नाराजी
कारवार येथे सागर माला योजना आंदोलनासंदर्भात लोकसभा सदस्य अनंतकुमार हेगडे आणि कारवारच्या आमदार रुपाली नाईक यांच्या प्रतिमेस काळे फासून व त्यांची निंदा केल्याबद्दल माजी आमदार सुनील हेगडे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तसेच या घटनेचा हल्याळ तालुका भाजपतर्फे त्यांनी निषेध केला आहे.
हल्याळ येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले, त्यावेळी सत्तेवर असलेल्या काँग्रेस पक्षाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सागर माला योजनेस शिलान्यास केले होते. तसेच त्यावेळेचे आमदार सतीश सैल यांनी शिलान्यास कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान भूषविले होते. एवढेच नव्हेतर या योजना मंगळूर येथे मंजूर करण्यात आले असता केंद्र सरकार आणि राज्य सरकारवर दबाव घालून सिद्धरामय्या यांच्याकडून कारवार येथे मंजूर करून घेण्यात यशस्वी झाले होते. परंतु आता मुग्ध मच्छीमार जनतेची दिशाभूल करून आता योजनेस विरोध करण्याचे ढोंगी नाटक सतीश सैल करत असून विकास दृष्टीच्या असलेल्या कामगिरीस अडथळा निर्माण करण्याच्या कार्यात आता माजी आमदार सतीश सैल गुंतले आहेत असा आरोप त्यांनी केला.
सागर माला योजना अनुष्ठानमुळे बंदर विकास होऊन कारवार जिल्ह्याचे चित्र संपूर्ण रित्या बदलणार आहे. तसेच कारवार जिल्हा ट्रान्सपोर्ट वाहतुकीचे प्रवेश दरवाजा होणार आहे.यामुळे ५ लाख मेट्रिक टन ट्रान्सपोर्ट वाहतुकीमुळे जिल्ह्याला संपर्क साधणाऱ्या जिल्ह्यातील राज्य महामार्ग विकासाकडे जाणार आहे, असे सुनील हेगडे यांनी सांगितले.
सतीश सैल यांनी आपण आमदार असता या योजनेस चालना देऊन आता सतीश सैल आणि माजी मंत्री आनंद अस्नोटीकर विरोध करत आहेत.कारण आपल्या स्वार्थासाठी कंत्राट दाराकडून कमिशन घेण्यासाठी कारवार जनतेची दिशाभूल करत आहेत. `राज्याचे काश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कारवारचे सौंदर्य या कामगिरीमुळे खराब होण्याचे प्रश्नच उदभवत नाही. परिसर संरक्षण बरोबर चर्चा द्वारे या महत्वपूर्ण योजनेस हिरवा कंदील मिळाला आहे.यावेळी हल्याळ भाजपचे अध्यक्ष गणपती कारंजेकर, माजी अध्यक्ष शिवाजी नरसानी, नगर सेवक उदय हुली, वासू पुजारी, विजय बोबाटी व पदाधिकारी उपस्थित होते.

फॅशन: इवनिंग गाउन

संबंधित बातम्या