ध्वनीप्रदूषणाच्या विरोधात विद्यार्थीही रस्त्यावर

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 30 जानेवारी 2020

मोरजी किनारी भागातील बेकायदा ध्वनीप्रदूषणप्रकरणी कारवाईची मागणी.गावडेवाडा किनारा ते आश्वे मांद्रेपर्यंत शांतातापूर्वक मेणबत्ती मोर्चा काढून ध्वनीप्रदूषणाला विरोध केला.

मोरजी: मोरजी किनारी भागात होणाऱ्या संगीत पार्ट्यातून ध्वनिप्रदूषण जर रोखले नाही, तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी आज सायंकाळी उशिरा मोरजी पंचायत मंडळ, नागरिक व महिला, विध्यार्थ्यांनी ध्वनिप्रदूषण विरोधात दिला.

मोरजी आश्वे मांद्रे किनारी भागात मोठ्या प्रमाणात बेकायदा संगीत रजनी आयोजित करून ध्वनिप्रदूषण केले जात आहे. याविषयी नागरिक वेळोवेळी तक्रारी देतात.मात्र, सरकारी यंत्रणा कोणतीच कारवाई करत नाही. त्याच्याविरोधात आता विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ध्वनिप्रदूषण विरोधात पाठिंबा देण्यासाठी मोरजी पंचायत मंडळ, गोंयचो आवाज, नागरिक, महिला आदींनी यात सहभाग घेऊन आवाज उठवला. यावेळी मोरजी सरपंच वैशाली शेटगावकर, उपसरपंच अमित शेटगावकर, पंच संपदा शेटगावकर, पवन मोरजे, विलास मोरजे, धनंजय शेटगावकर, मुकेश गडेकर, शिवनाथ शेटगावकर, नयनी शेटगावकर, विद्याप्रसारक हायस्कूल व पीटर आल्वारीस हायस्कूलचे विद्यार्थी सहभागी झाले होते.यावेळी पंचायत मंडळाने यापुढे या ध्वनिप्रदूषण विरोधात आम्ही यापुढे कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा दिला.

मोरजी आश्वे मांद्रे किनारे कासव संवर्धन मोहिमेसाठी संवेदनशील जाहीर करण्यात आला आहे. शिवाय या किनारी संध्याकाळी सात वाजल्यानंतर कोणत्याच प्रकारचे वीज आणि ध्वनिक्षेपक वाजवण्यास निर्बंध असतानाच मोठ्या प्रमाणात बेकायदा संगीत रजनी वाजवले जाते.

यावेळी सरपंच वैशाली शेटगावकर यांनी बोलताना मोठ्या प्रमाणात जे किनारी भागात संगीत रजनी सुरू आहे, त्याविषयी अनेकवेळा तक्रारी करून सरकारी यंत्रणा काहीच करत नसल्याने आता विद्यार्थ्यांनाच रस्त्यावर उतरावे लागले. विद्यार्थी रस्त्यावर उतरल्यानंतर काय होते, याची प्रचिती यापूर्वी आली आहे. आता जर या पुढे ध्वनीप्रदूषण करून पार्ट्या आयोजित केल्या तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. शिवाय पंचायतीने दिलेले रेस्टारंट परवाने मागे घेण्यात येईल, असा इशारा दिला.

माजी सरपंच धनंजय शेटगावकर यांनी बोलताना बेकायदा पार्ट्या बंद करण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. जर सरकारला जमत नसेल तर आम्ही बंद पाडू, असा इशारा दिला.
मोरजी टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष संजय कोले म्हणाले, विद्यार्थ्यांना रस्त्यावर यावे लागत असूनही लोकप्रतिनिधी झोपेचे सोंग घेत आहेत. पर्यटनाच्या नावावर चाललेला धिंगाणा त्वरित बंद करावा, अन्यथा आमदार सोपटे यांच्या घरावर विद्यार्थ्यांचा मोर्चा नेण्यात येईल, असेहीते म्हणाले.

नागरिकत्व’ कायदा समर्थनार्थ २ रोजी रॅली :राजेंद्र आर्लेकर

विद्यार्थ्यांच्या अभ्यासावरही परिणाम
सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मोरजीतील विद्याप्रसारक हायस्कूल व पीटर आल्वारीस मेमोरियल हायस्कूलचे विद्यार्थी या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात रस्त्यावर आले होते. विधार्थ्यांना अभ्यास करताना मोठ्या अडचणी येत असल्याने हे विद्यार्थी शांततेने मेणबत्ती मोर्चात सहभागी होऊन सरकारचे लक्ष वेधत होते. मोठ्या प्रमाणात विधार्थी, महिला, नागरिक विविध संघटना सहभागी झाल्या होत्या.

 

संबंधित बातम्या