विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उत्तेजन मिळायाला हवे

गोमंतक वृत्तसेवा
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

वेशभूषा स्पर्धेतील विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालयाच्या बक्षीसप्राप्त विद्यार्थ्यांसोबत दै. ‘गोमन्‍तक’चे सहयोगी संपादक किशोर शेट मांद्रेकर, प्रकाश तळवणेकर, पी. ए. सूर्यवंशी, सुधीर कुबडे, संस्थेच्या संचालिका संध्या पालियेकर, पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष कविता खुशवाह व शिक्षक.

 

पेडणे : शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांच्या अंगातील इतर कलागुणांना उत्तेजन मिळायला हवे. ते काम विद्याप्रबोधिनी उत्तमप्रकारे करत आहे, असे प्रतिपादन दै. ‘गोमन्‍तक’चे सहयोगी संपादक किशोर शेट मांद्रेकर यांनी केले.

येथील विद्यासंकुल पूर्व प्राथमिक व विद्यावर्धिनी प्राथमिक विद्यालय आयोजित वेशभूषा स्पर्धा व पालकांसाठी पाककला स्पर्धा बक्षीस वितरण सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्‍हणून ते बोलत होते.
याप्रसंगी व्यासपीठावर निमंत्रित पाहुणे म्हणून दै. ‘गोमन्‍तक’चे पेडणे प्रतिनिधी प्रकाश तळवणेकर, चित्रकार तथा समाजसेवक पी. ए. सूर्यवंशी, आयटीआयचे निवृत्त शिक्षक सुधीर कुबडे, संस्थेच्या संचालिका संध्या पालियेकर व पालक शिक्षक संघाच्या अध्यक्ष कविता खुशवाह आदी उपस्थित होते.
किशोर शेट मांद्रेकर म्हणाले की, पालक आणि शिक्षक मुलांना घडविण्याचे काम करू शकतात. हे विद्यालय ते काम करत आहे. अशा स्पर्धांच्या आयोजनामुळे लहान वयात व्यासपीठ मिळवून दिल्याने विद्यार्थ्यांत आत्मविश्वास निर्माण होवून भावी आयुष्यात ती यशस्वी होण्यास मदत होईल.

प्रकाश तळवणेकर म्हणाले की, विद्या संकुलने मुलांना शिक्षण देतानाच त्यांच्यातील कलागुणांना नेहमीच प्राधान्य देउन शैक्षणिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. तालुका आणि राज्यात विविध कार्यक्रम, स्पर्धांत बक्षिसे मिळवून दर्जेदार विद्यालय म्हणून नाव प्राप्त केले आहे.स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे :
वेशभूषा गट १ : प्रथम मनन सूर्यवंशी, द्वितीय विधी मालवणकर, तृतीय अवनीश नाईक. उत्तेजनार्थ सत्वीत नाईक, कश्रा पार्सेकर, आराध्या उगवेकर. वेशभूषा गट २ : प्रथम सर्वांगी शेटये व दिपिका कवठणकर. द्वितीय श्रावणी चंद्रोजी, तृतीय रुद्र गावडे.
उत्तेजनार्थ शौर्य देसाई, वंश नागवेकर, वेदांत खुशवाह. वेशभूषा स्पर्धेसाठी दोन्ही गटातून ११० विद्यार्थी सहभागी झाले होते.
पालकांसाठी पाककला स्पर्धा : प्रथम कविता खुशवाह, द्वितीय स्वाती केतकर, निकिता कशालकर. उत्तेजनार्थ नाईक, मुक्ती तळकर.
वेशभूषा व पाककला स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून पी. ए. सूर्यवंशी व सुधीर कुबडे यांनी काम पाहिले. विजेत्यांना पाहुण्यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.
प्रारंभी शिक्षिका काश्मिरी केरकर यांनी स्वागत केले. शिक्षिका सुप्रिया शेटये व रंजीता नागवेकर यांनी सूत्रसंचालन केले. मनाली च्यारी यांनी आभार मानले.
 

 

सीएएबाबत चर्चची भूमिका चुकीची

संबंधित बातम्या