राज्यात सर्वाधिक भाताचे पीक घेणारा झेवियर फर्नांडिस 

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 16 जानेवारी 2020

सासष्टी :20 हेक्टर शेतजमिनीत 40 टनच्या वर पीकः पंधरा जणांना रोजगार

सासष्टी :20 हेक्टर शेतजमिनीत 40 टनच्या वर पीकः पंधरा जणांना रोजगार
पारंपारिक शेतीला आधुनिकतेची जोड तसेच शेतीत योग्य नियोजन केल्यास अल्प मनुष्यबळातही उत्कृष्ट पध्दतीने शेती करता येते तर भरघोस उत्पन्नही मिळविता येते, हे केपे येथील शेतकरी झेवियर फर्नांडिस (44) यांनी सिध्द करुन दाखविले आहे. झेवियर खरीप व रब्बी हंगामात दक्षिण गोव्यातील सुमारे 2 लाख चौरस मीटर (20 हेक्टर ) शेती जमिनीत भात शेतीची लागवड करत असून वर्षाला 40 टनच्या वर त्याला भाताचे उत्पन्न मिळत आहे. संपूर्ण गोव्यात सर्वाधिक भाताचे पीक घेण्याचा विक्रम झेवियरचा नावावर असून शेती करुन पैसा कमविता येत नाही, ही बाब खोडून आसपासच्या शेतकऱ्यांचा समोर त्यांनी आदर्श ठेवला आहे.
केपे येथे राहणाऱ्या झेवियर फर्नांडिस वास्कोला जहाजावर काम करीत होता. नोकरीच्या व्यापात शेती करणे त्यांना शक्य होत नव्हते. नंतर 2010 साली जहाजावरील काम बंद पडल्यावर त्यांनी पारंपारिक रित्या वैयक्तीक वापरासाठी करण्यात येणाऱ्या शेतीला व्यवसायिक स्वरुप देण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला झेवियर केपे भागात असलेल्या शेती जमिनीत भात शेतीची लागवड करीत होते. पण, नंतर त्यांना शेती व्यवसायात यश मिळत राहिल्याने दक्षिण गोव्यातील अन्य शेतीजमिनी कंत्राटी पध्दतीवर घेऊन त्यांनी शेती करण्यास सुरुवात केली. झेवियर दक्षिण गोव्यातील चांदर, गुडी पारोडा, नावेली, वेर्णा, केपे आदी भागात दोन्हीही हंगामात शेती करीत असून वर्षाला त्याला सुमारे 40 ते 45 टनच्या आसपास उत्पन्न मिळत आहे. भातशेतीत सर्वाधिक पीक घेणाऱ्यांमध्ये झेवियरचा हात धरणारा दुसरा कुणीही नाही.गोव्यात असलेल्या शेती जमिनी पडीक राहु नये, यासाठी झेवियर गोव्यातील विविध शेतीजमिनीत लागवड करीत आहे. शेतीवरुन फायदा मिळाला नाही तरी चालेल. पण, जमिनी पडीक राहु नये, हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. यंदा खरीप हंगामात झेवियरला मुसळधार पडलेल्या पावसाचा फटका बसला होता.पण, नुकसान भरपाई मिळण्याची वाट न पाहता त्यांनी रब्बी हंगामासाठी जोमाने तयारी केली आहे.सुरुवातील झेवियरची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. पण, आता त्याच्या हाताखाली पंधरा कामगार काम करीत असून त्याच्याजवळ एक ट्रेक्टर व तीन पावर टिलर आहेत. शेती करण्याची आवाड व प्रेरणा पुर्वजांकडून मिळाली असून झेवियर यांनी फर्नांडिस सेल्फ हेल्प ग्रपुचीही स्थापन केली आहे.
 राज्यात विलिनीकरणवादीच आज चालवतात सरकार: सरदेसाई
2018 साली झेवियर यांना 50 टनच्या आसपास उत्पन्न मिळाले होते तर गेल्या वर्षी 45 टनच्या आसपास उत्पन्न मिळाले आहे. गेल्या वर्षी 17 टन पीक आदर्श कृषी संस्थेला पुरविले तर 18 टन पीक कॉस्ता इडस्ट्रीला पुरविले होते. झेवियर मिळालेल्या भात पिकाचे तांदुळही करीत असून गेल्या वर्षी त्यांनी 3 ते 4 टनच्या भातावर प्रक्रिया करुन तांदुळ तयार केले होते. झेवियर हे पूर्णपणे शेती व्यवसायावर अवलंबून असल्यामुळे कुटुंबियांकडून त्यांना सहाय्यता मिळत असून कृषी विभागाकडून अनुदानित दरात मिळणाऱ्या यांत्रिकीकरणाचा लाभ झेवियर मोठ्या प्रमाणात घेत आहेत.गोव्यात अनेक शेतीजमिनी पडीक राहत असून त्या शेतीजमिनीवर पुन्हा लागवड करण्यासाठी तरुण पिढीने पुढे येणे आवश्यक आहे. गोव्यात मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग शेतीकडे वळल्यास गोव्यात शेती जमिनी पडीक राहणार नाही, असे झेवियर फर्नांडिस यांनी स्पष्ट केले.   
झेवियर फर्नांडिस केपे तालुक्यात सुमारे 1.5 हेक्टर जमिनीत शेती करीत असून दक्षिण गोव्यातील अन्य जमिनी कंत्राट पध्दतीवर घेऊन ते लागवड करीत आहे. झेवियर ज्याती व करझत भाताच्या जातींची लागवड करत असून 50 टक्के कापणी झेवियर हारवेस्टरच्या मदतीने करीत आहे. झेवियर यांना अनुदानित दरात शेतीसाठी लागणारे तंत्रज्ञान, बियाणे व कीटकनाशक पुरविण्यात येत असून रब्बी हंगामासाठी झेवियर यांना 2 टन बियाणे पुरविण्यात आलेली आहे. भाताला प्रतिकिलो 11 ते 12 रुपये दर मिळत असून झेवियर यांना सहाय्याभूत निधीचा फायदा होत आहे. झेवियर भातावर प्रक्रिया करुन तादुंळ बनवित असल्यामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात नफा मिळत आहे, असे केपे कृषी विभागीय अधिकारी संदेश राऊत देसाई यांनी सांगितले. 
 

संबंधित बातम्या