कांदोळीच्या इसमाची काणकोण रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या  

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 23 जानेवारी 2020

आगोंद:कांदोळीच्या इसमाची काणकोण
रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या

आगोंद:कांदोळीच्या इसमाची काणकोण
रेल्वे स्थानकाजवळ आत्महत्या
काणकोण येथे कोंकण रेल्वे स्थानकाजवळ एका इसमाने आज रेल्वे ट्रॅकवर आपले धड शरिरापासून वेगळे करून आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना आज संध्याकाळी उघडकीस आली.कोंकण रेल्वे पोलिसांनी मृतदेह रितसर ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणी करता मडगाव इस्पितळात पाठवून दिला असल्याचे पोलिस सूत्रांकडून सांगण्यात आले.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर इसमाचे नाव जॉन फर्नांडिस(५८) असे असून तो मूळ कांदोळी, उत्तर गोव्यातील असून सध्या वास्तव्यास पैंगीण येथे आपल्या नातेवाईकांकडे राहत होता.आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नसल्याची माहिती पोलिस सूत्रांकडून देण्यात आली.

 

 

 

 

 

कुरिगद्दा अपघातात एक ठार

संबंधित बातम्या