साक्षी नोंदवा मात्र उलटतपासणी नको

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

पणजी:गोवा खंडपीठाचा निर्देश, ‘इन कॅमेरा’ सुनावणीस मान्यता
कथित बलात्कारप्रकरणी संशयित तरुण तेजपाल यांच्याविरुद्ध म्हापसा सत्र न्यायालयातील साक्षीदारांची जबानी नोंद करण्यास हरकत नाही. मात्र, त्याची उलटतपासणी पीडितेच्या अर्जावरील निर्णय होईपर्यंत घेऊ नये, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने दिले.या अर्जामध्ये दुरुस्ती करण्यासाठी वेळ घेतल्याने उच्च न्यायालयातील सुनावणी ४ फेब्रुवारीपर्यंत तहकूब करून ही सुनावणी ‘इन कॅमेरा’मध्ये घेतली जाणार आहे.

या अर्जावरील सुनावणी एकसदस्यीय की द्विसदस्यीय खंडपीठासमोर व्हावी यालाच संशयिताचे ज्येष्ठ वकील अमित देसाई यांनी आक्षेप घेतला.घटनेच्या २२६ खाली हा अर्ज सादर करण्यात आल्याने त्यावर एकसदस्यीय खंडपीठासमोर सुनावणी व्हायला हवी. त्यामुळे पीडित तरुणीचे वकील विजय हिरेमठ यांनी अर्जात दुरुस्ती करण्यासाठी वेळ मागितला. ही सुनावणी इन कॅमेरामध्ये घेण्याची विनंती पीडितेच्या वकिलांनी केली. खंडपीठाने सत्र न्यायालयाला खटल्यावरील सुनावणीवेळी पिंजऱ्यात उभी राहून उलटतपासणीला सामोरे जाणाऱ्या पीडित तरुणी व संशयित याच्यामध्ये पडदा घालण्याचे निर्देश दिले तरी ते फेटाळण्यात आले असे त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले.
सर्वोच्च न्यायालयाने या खटल्यातील सुनावणी ६ महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. खटल्यावरील सुनावणी उच्च न्यायालयात असलेल्या अर्जामुळे अडली आहे. पीडित तरुणीच्या उलटतपासणीवेळी अनावश्‍यक प्रश्‍न विचारण्यास आक्षेप घेऊन त्याला बंदी घालावी यासाठी तिने हा अर्ज केला आहे. दरम्यान, वेळेचे बंधन व साक्षीदारांची संख्याही मोठी असल्याने सत्र न्यायालयात साक्षीदारांची साक्ष नोंद करण्याची प्रक्रिया सुरू ठेवून फक्त उलटतपासणी करू नये असे निर्देश गोवा खंडपीठाने दिले. आतापर्यंत पीडित तरुणीची जबानी नोंद होऊन उलटतपासणी कित्येक दिवस सुरू होती. या उलटतपासणीवेळी अनावश्‍यक प्रश्‍न विचारून अपमान करून व तिचे खच्चीकरण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा दावा या तरुणीने अर्जात केला आहे.

आमदारांच्या प्रतिमेस काळे फासल्याने निषेध

संबंधित बातम्या