टाटा स्टील लिमिटेडचा आर्थिक खर्च

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

टाटा स्टीलचा भांडवली खर्च 9 हजार कोटींवर जाणार

पुढील आर्थिक वर्षासाठी भांडवली तरतूद करताना कंपनीकडून विशेष काळजी घेतली जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

मुंबई : टाटा स्टील लिमिटेडचा भांडवली खर्च चालू आर्थिक वर्षात 9 हजार कोटी रुपयांवर पोचण्याची शक्‍यता आहे.

चालू आर्थिक वर्षासाठी कंपनीने भांडवली खर्च 8 हजार कोटी रुपयांवरून 12 हजार कोटी रुपयांवर जाण्याची शक्‍यता टाटा स्टीलकडून याआधी वर्तवण्यात आली होती. डिसेंबरअखेर सरलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीने 2 हजार 777 कोटी रुपयांचा खर्च केला असून, त्यामुळे चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यात कंपनीचा एकूण भांडवली खर्च 7 हजार 762 कोटी रुपयांवर पोचला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

कंपनीने भारतातील कामकाजासाठी 1 हजार 367 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. यात ओडिशातील कलिंगानगर उत्पादन प्रकल्पासाठी केलेल्या 935 कोटी रुपयांच्या भांडवली खर्चाचाही समावेश आहे. पुढील वर्षभरातसुद्धा कंपनीकडून आणखी भांडवली खर्च केला जाण्याची शक्‍यता असून, बाजारपेठेतील परिस्थितीवर ते अवलंबून असणार आहे.

 

 

 

 

 

 

पे-पार्किंग सेवेत अडथळे

संबंधित बातम्या