टॅक्सी भाडे लवकरच डिजीटल मीटरनुसार

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 21 जानेवारी 2020

पणजी:६ महिन्यांत होणार प्रक्रिया पूर्ण, सरकारची खंडपीठाला माहिती
राज्यातील टॅक्सींसाठी सुधारीत भाडे दरपत्रक व डिजीटल मीटर बसविण्याची प्रक्रिया येत्या सहा महिन्यांत पूर्ण केली जाईल, असे आश्‍वासन सरकारतर्फे देण्यात आल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने जनहित याचिका तसेच वाहतूक संचालकांविरुद्धची अवमान याचिका निकालात काढली.त्यामुळे पुढील सहा महिन्यानंतर राज्यात डिजीटल मीटरनुसार भाडे आकारण्याची सक्ती टॅक्सीचालकांना होणार आहे.

उच्च न्यायालयासमोर आज टॅक्सींना डिजीटल मीटर्स बसविण्यासंदर्भातची जनहित याचिका सुनावणीस आली असता टॅक्सी सुधारीत दरपत्रक अधिसूचना येत्या १५ दिवसांत काढण्यात येईल व त्यानंतर आठवड्यानंतर हे डिजीटल मीटर बसविण्याचे कंत्राट मिळालेली कंपनी त्याची अंमलबजावणी करण्यास सुरवात करणार आहे.या डिजीटल मीटरमध्ये ‘इमरजन्सी पॅनिक बटन’ तसेच ट्रॅकिंग डिव्हाईसची (जीपीएस) सोय उपलब्ध केली जाणार आहे, अशी माहिती ॲडव्होकेट जनरल देविदास पांगम यांनी दिली.
देशातील सर्व टॅक्सींना डिजीटल मीटर बसविण्याची सक्ती आहे. मात्र, गोव्यात त्याला विरोध झाला होता.सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय असल्याने सरकारने त्याची अंमलबजावणी करणे क्रमप्राप्त असल्याचे टॅक्सीचालक संघटनांना सांगितले होते.त्यानंतर उच्च न्यायालयात टॅक्सींना डिजीटल मीटर लागू करण्यासंदर्भातची मागणी करणारी जनहित याचिकाही दाखल झाली होती.त्यामुळे सरकारने त्याची प्रक्रिया सुरू केली होती.या डिजीटल मीटरमध्ये आवश्‍यक असलेल्या सोयींमध्ये दुरुस्ती झाल्याने काढलेली निविदा रद्द करावी लागली होती व नव्याने निविदा प्रक्रिया करावी लागली होती.या प्रक्रियेनंतर सरकारने ‘रोझमाल्टा’ या कंपनीला डिजीटल मीटर बसविण्याचे कंत्राट दिले आहे. जिल्ह्यात प्रत्येकी दोन केंद्र हे डिजीटल मीटर बसविण्यासाठी उपलब्ध केली जाणार आहे.सुमारे १२ हजार पर्यटन टॅक्सी तसेच काळ्या - पिवळ्या टॅक्सी राज्यात आहेत.

अधिकारी हात झटकण्याच्या तयारीत!

संबंधित बातम्या