करदात्यांच्या पॅन, इतर माहितीची प्राप्तिकर विभाग आणि सेबी करणार देवाणघेवाण  

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

करदात्यांचे पॅन, इतर माहिती
प्राप्तिकर विभाग "सेबी'ला देणार

नवी दिल्ली : प्राप्तिकर विभाग करदात्यांचे पॅन आणि इतर माहिती "सेबी'ला देणार आहे. "सेबी'ला विविध गैरव्यवहारांवर नियंत्रण ठेवण्यास मदत करण्यासाठी ही माहिती प्राप्तिकर विभागाकडून दिली जाणार आहे.

शेअर बाजारातील गैरव्यवहार आणि इतर बाबींवरील तपासात यामुळे "सेबी'ला मदत होणार आहे. केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाकडून (सीबीडीटी) प्राप्तिकर विभागाच्या धोरणांची आखणी केली जाते. "सीबीडीटी'ने प्राप्तिकर कायद्याच्या कलम १३८ (१) अंतर्गत हा आदेश दिला आहे. या संदर्भात प्राप्तिकर विभाग आणि "सेबी' लवकरच परस्पर सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्याची शक्‍यता आहे.

या करारावर माहितीची देवाणघेवाण, गोपनीयतेची खबरदारी, माहितीची सुरक्षितता यासारख्या बाबींचा समावेश असेल. करदात्यांचे पॅन, वडिलांचे किंवा पतीचे नाव, जन्मतारीख, छायाचित्रे, सही, कंपनीच्या भागीदारांची नावे, "केवायसी', ईमेल आयडी, प्राप्तिकर विवरणपत्रे, समभागांच्या व्यवहारातून मिळणारे उत्पन्न, बॅंक खाते आदी बाबींची माहिती प्राप्तिकर विभागाकडून "सेबी'ला गरजेनुसार देण्यात येईल.

 

 

 

 

 

 

संबंधित बातम्या