पाणी वाचवा ,जीवन फुलवा संदेश घेऊन शिक्षक दांपत्याचा देशभर प्रवास

ajit and darshana
ajit and darshana

पणजी,
देशभर वाढते पाण्याचे दुर्भिक्ष लक्षात घेऊन  घेऊन उत्तर प्रदेशातील मथुरा येथील अजित कुंतल आणि दर्शना उपाध्याय हे शिक्षक जोडपं देशभर फिरत आहे. त्यांना आज गोव्यात येऊन अनेक शाळांना भेटी देत हा संदेश लोकांपर्यंत आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला. पणजी ,वास्को , मडगाव , फोंडा यासारख्या भागात त्यांनी हा संदेश देण्यासाठी शाळांना भेटी दिल्या.
राजस्थानमधील जेसलमर मधील भटकंती करताना पाण्याचे महत्व लक्षात आले. पाण्यासाठी आजही इथली कुटुंबे दिवसभर कष्ट करतात, हे लक्षात आल्यानंतर पाणी वाचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, हा संदेश त्यांच्या डोक्यात पक्का झाला. मग यावर काम करणे सुरू झाले. जगभरात विचार केला तर 97 टक्के पाणी हे समुद्राच्या स्वरूपात असून उरलेल्या तीन त्यापैकी जवळजवळ 2.5 टक्के पाणी हे बर्फरूपात आहे आणि उरलेले केवळ पॉईंट तीन टक्के पाणी हे पिण्यायोग्य आहे. या पाण्याचा योग्य वापर केला नाही तर आपल्या समोर मोठी समस्या निर्माण होईल, हे लक्षात आल्यानंतर हाच संदेश घेऊन देशभर हे जोडपे फिरत आहे . 
मूळ मथुरेचे असलेलं हे जोडपे आतापर्यंत उत्तर प्रदेश, राजस्थान, गुजरात, मध्य प्रदेश महाराष्ट्रातून गोव्यात आले आहे त्यांचा इथून पुढचा प्रवास कर्नाटक केरळ मार्गे पूर्ण देशभर असेल .देशातल्या बहुतांशी राज्यांच्या राजधान्या युनियन टेरिटरी मध्ये जाण्याचा त्यांचा प्रयत्न आहे गोव्यात त्यांनी अनेक व्यक्तींच्या भेटी घेत हा संदेश पुढे देण्याची विनंती केली . 
पाणी वाचवा जीवन फुलवा हा संदेश देण्यासाठी अजितने शाळे कडून सुट्टी घेतली आहे तर दर्शनाने आपली खाजगी नोकरी सोडत हा संदेश देण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत परत लवकरच हे जोडपे आपल्या शिक्षकी पेशाकडे वळणार असून हा संदेश देण्यासाठी ते आयुष्यभर झटणार असल्याचं अजित आणि दर्शनानं सांगितले . 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com