शिक्षकांना मुख्यालय सोडण्यास बंदी

Dainik Gomantak
शुक्रवार, 17 एप्रिल 2020

नववी व अकरावीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकात सुधारण्याची गरज असा शेरा असेल असे विद्यार्थी पुरवणी परीक्षेस बसण्यास पात्र ठरणार आहेत.

पणजी

गोवा माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने येत्या दिवसांत शिक्षकांनी मुख्यालय सोडू नये, त्यांच्या सेवेची परीक्षेसंदर्भात गोपनीय कामासाठी कधीही गरज भासू शकते असे परिपत्रक आज जारी केले आहे. बारावीच्या उर्वरीत पेपराचे वेळापत्रक परीक्षेच्या पाच दिवस आधी तर दहावीच्या परीक्षेचे वेळापत्रक १० दिवस आधी जाहीर केले जाणार असल्याचेही मंडळाने आज पून्हा स्पष्ट केले आहे.
मंडळाने म्हटले आहे की नववी व अकरावीच्या ज्या विद्यार्थ्यांच्या प्रगतीपत्रकात सुधारण्याची गरज असा शेरा असेल असे विद्यार्थी पुरवणी परीक्षेस बसण्यास पात्र ठरणार आहेत. शिक्षण संस्थांच्या प्रमुखना उद्देशून जारी केलेल्या या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे, की सध्याची परिस्थिती पाहता बारावीच्या परीक्षेच्या उत्तरपत्रिकांची तपासणी सुरु करता आलेली नाही.ही तपासणी कधी सुरु होईल हे तपासणी सुरु करण्याच्या पाच दिवस आधी संबंधिताना कळवण्यात येणार आहे.
टाळेबंदीच्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण, कौशल्य विकास, फिट इंडिया उपक्रम, योग, चित्रकला दी विद्यर्थ्यांच्या छंदाना प्रोत्साहीत करण्यासाठी विद्यालयांनी काय उपक्रम राबवले याची माहितीही मंडळाच्यास संकेतस्थळावर शैक्षणिक संस्था प्रमुखांनी द्यावी असेही या परिपत्रकात मंडळाचे सचिव भगिरथ शेटये यांनी म्हटले आहे.

संबंधित बातम्या