‘तीन मामा एक ड्रामा’ला शिवोलीत उदंड प्रतिसाद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

कुचेलीः शेळ-शिवोली येथील श्री आजोबा देवस्थानच्या वार्षिकोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘तीन मामा एक ड्रामा’ या नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

कुचेलीः शेळ-शिवोली येथील श्री आजोबा देवस्थानच्या वार्षिकोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या ‘तीन मामा एक ड्रामा’ या नाटकाला रसिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.

बामणवाडा, शेळ, शिवोली येथील श्री आजोबा नवयुवक संघाने आयोजित केलेल्या या नाटकासाठी प्रा. हनुमंत चोपडेकर यांनी लेखन केले असून, नाट्यकर्मी श्रीकांत अनंत साळगावकर यांच्या सुरेख दिग्दर्शनामुळे नाटकाची उत्कंठा वाढल्याचे रसिकांतून बोलले जात होते. नकलाकार श्रीकांत साळगावकर यांनी आतापर्यंत दिग्ददर्शित केलेल्या प्रत्येक नाटकात शीर्षकगीत सादर केले आहे. याही नाटकात साळगावकर यांनी ही परंपरा जपली आहेत. धारगळचे प्रसिद्ध गायक कलाकार नामदेव धारगळकर यांनी शीर्षकगीत लिहिले होते.

कोरोनाचे आणखी दोन संशयित रुग्ण सापडले

नाटकाला श्रृती ताह्मणकर (हार्मोनियम), विश्वास चोडणकर (तबला) यांनी संगीत साथ केली. महेंद्र मांजरेकर यांनी नाटकाला साजेसे असे पार्श्वसंगीत केले आहे. या नाटकात विष्णू सडेकर, संतोष पेडणेकर, विश्वास तांडेल, संकल्प सडेकर, गणेश कळंगुटकर, विपूल चोडणकर, साहील सडेकर, दिव्येश पालयेकर, प्रवीण कळंगुटकर, मोहीत पालयेकर आणि प्रतीक्षा पालयेकर यांनी भूमिकेला न्याय दिल्याने रसिकांकडून कलाकारांनी कौतुकाची थाप मिळवली.
गोवा

संबंधित बातम्या