तेरेखोल पूल बांधकामाचा मार्ग मोकळा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 25 जानेवारी 2020

पणजी:गोवा फाऊंडेशनचा अर्ज हरित लवादाकडून निकालात
तेरेखोल पुलाच्या कामाला आव्हान दिलेली गोवा फाऊंडेशनचा अर्ज राष्ट्रीय हरित लवादने निकालात
काढताना राष्ट्रीय समुद्र तंत्रज्ञान संस्थेने (एनआयओटी) अहवालात केलेली निरीक्षणे व शिफारशीनुसार पुलाचे बांधकाम करण्याचे निर्देश दिले आहेत.या निर्णयामुळे तेरेखोल पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

गोवा फाऊंडेशनने २०१५ साली केलेल्या याचिकेत तेरेखोल पुलाच्या कामाला आव्हान दिले होते.हे पुलाचे बांधकाम पर्यावरण, वन व हवामान बदल मंत्रालयाच्या तसेच राज्य पर्यावरण घातक मूल्यांकन अधिकारिणीच्या परवानगीशिवाय करण्यात येत आहे व हे बांधकाम ‘ना विकास’ क्षेत्रात येत असल्याचा दावा केला होता.या पुलाच्या बांधकामामुळे मच्छीमारी व्यवसायावर होणाऱ्या परिणामासंदर्भात योग्य ती काळजी घेण्यात आलेली नाही, असे अर्जात नमूद केले होते.या अर्जावरील प्राथमिक सुनावणीवेळी लवादने काम ‘जैसे थे’ ठेवण्याचा आदेश दिला होता व एनआयओटीच्या तज्ज्ञांकडून अहवाल मागितला होता.या संस्थेने सर्वे करून अहवाल सादर केला होता व त्यामध्ये काही निरीक्षणे तसेच शिफारशी केल्या होत्या.
या तेरेखोल पुलाचा वापर सार्वजनिक वापरासाठी होणार आहे. हा पूल पर्यावरणाला कोणताही धोका लागणार नाही, याची काळजी घेऊन
बांधकाम करणे शक्य आहे.जे बेकायदेशीर दाखवण्यात आले आहे, ते बांधकाम बंद ठेवण्यासाठी कोणतेच स्पष्टीकरण नाही.त्यामुळे हा अर्ज निकालात काढण्यात येत आहे.या पुलाचे काम एनआयओटीमध्ये नमूद केलेल्या शिफारशी व निरीक्षणानुसार पुढील बांधकाम सुरू करावे, असे आदेशात लवादने म्हटले आहे.

संबंधित बातम्या