हा अर्थसंकल्प म्हणजे घर मोडून मांडव घालण्यासारखेच

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 2 फेब्रुवारी 2020

पणजीः केंद्रीय अर्थसंकल्‍प म्हणजे घर मोडून मांडव घालण्याची सरकारची तयारी असल्यासारखा आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. गोव्यासाठी या अर्थसंकल्पात काहीच नाही, असेही ते म्हणाले.

त्यांनी सांगितले, की बेरोजगारीवर या अर्थसंकल्पात शब्दही उच्चारण्यात आलेला नाही. या महत्त्वाच्या विषयाकडे सरकारने काणाडोळा केलेला दिसतो. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी लांबलचक भाषण केले खरे, पण त्यामागे कोणत्याही कृतीचे नियोजन नव्हते. निर्गुंतणूक करून सरकार घर मोडून मांडव घालण्याची तयारी करत आहे.

पर्यटन, मच्छीमार व्यवसायाला चालणा देणारा अर्थसंकल्प : मुख्यमंत्री

या केंद्रीय अर्थसंकल्पात गोव्यासाठी काहीच नाही असे नमूद करून ते म्हणाले, यावरून राज्यातील पर्यटन आणि खाण व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त करून देण्यात केंद्र सरकारला अजिबात रस नाही हे स्पष्ट होते.

संबंधित बातम्या